Full Width(True/False)

Nokia G50 असेल कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, मिळतील हे जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः नोकिया चे स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD Global सध्या ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो. कंपनी या फोनला याच महिन्यात काही देशात लाँच करू शकते. नुकतेच या फोनला TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहिले गेले आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, नोकियाचा हा फोन भारता सोबत चीनमध्येही लाँच केला जावू शकतो. वाचा: मिळू शकतात हे फीचर आणि स्पेसिफिकेशन TENAA लिस्टिंगच्या माहितीनुसार फोन मध्ये 720x1640 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.८२ इंचाचा एचडी प्लस IPS डिस्प्ले मिळणार आहे. या लिस्टिंगच्या माहितीनुसार, हा फोन २ जीबी ते ८ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी ते ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येते. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेट ऑफर करणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात मिळणारा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा असू शकतो. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करू शकतो. वाचा: या फोनमध्ये बॅटरी म्हणून 4850mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. जो फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येवू शकते. ओएस म्हणून हा फोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. फोनमध्ये देण्यात आलेले फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटन आत येईल. कंपनीचा हा फोन ब्लू आणि डॉन (Dawn) कलर ऑप्शन मध्ये येवू शकते. फोनची किंमती संबंधी अफवा पसरली आहे की हा फोन २३० यूरो म्हणजेच १९ हजार ८०० रुपयाच्या किंमती सोबत येवू शकतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DIORvt