नवी दिल्ली : ने यावर्षी नॉर्ड सीरिजमधील नवीन OnePlus Nord 2 5G ला लाँच केले होते. या स्मार्टफोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम, मीडियाटेक डायमेंसिटी १२०० एआय प्रोसेसर, फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम व्हेरिएंटच्या या स्मार्टफोनची किंमत २९,९९९ रुपये आहे. मात्र, अॅमेझॉनवरून तुम्ही खूपच कमी ईएमायवर खरेदी करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे यूजर्सला दरमहिना १,४५५ रुपये देऊन फोन खरेदी करता येईल. ईएमआय २४ महिने चालेल व यूजर्सला १५ टक्के दराने ४,९१० रुपये व्याज द्यावे लागेल. अशाप्रकारे फोन्ससाठी ३४,९०९ रुपये यूजर्सला द्यावे लागतील. वाचा: OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन मध्ये ६.४३ इंचाचा फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल आहे. रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे, जो गेमिंग अनुभव शानदार बनवतो. यात १२ जीबीपर्यंत रॅम आणि मीडियाटेक डायमेंसिटी १२००-AI चिपसेट दिली आहे. १,५०० रुपयांच्या ईएमआयवर तुम्ही ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येणारे व्हेरिएंट खरेदी करू शकता. OnePlus Nord 2 5G ची बॅटरी ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित ऑक्सिजनओएस ११.३ वर काम करतो. यात फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळते. OnePlus Nord 2 5G चा कॅमेरा सेटअप OnePlus Nord 2 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आहे, जो Sony IMX ७६६ सेंसर आहे. यात ८ मेगापिक्सल सेकेंडरी आणि २ मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आहे. फ्रंटला सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. OnePlus Nord 2 5G चे अन्य फीचर्स सुरक्षेसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. सोबतच, फोटोग्राफीसाठी शानदार कॅमेरा फीचर्स आणि मोड देखील मिळतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uj0uFm