Full Width(True/False)

६ जीबी रॅमचा रेडमीचा लेटेस्ट स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी, फोनची फीचर्स जबरदस्त

नवी दिल्लीः रेडमीने अखेर भारतात आपला बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन आता देशात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर, मोठा रॅम आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन Redmi 9 लेटेस्ट रिब्रँड व्हेरियंट आहे. जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा फोन तुम्हाला पसंत पडू शकतो. Redmi 9 Activ ची किंमत Redmi 9 Activ च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची सुरुवातीची किंमत ९ हजार ३९९ रुपये आहे. तसेच ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. रेडमीचा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन कार्बन, ब्लॅक, कोरल ग्रीन आणि मॅटेलिक पर्पल मध्ये उपलब्ध आहे. Redmi 9 Activ फोनला Amazon, Mi।com, Mi Home आणि Mi Studio स्टोरवरून खरेदी करू शकता. हा फोन सर्व साइट्स वर उपलब्ध आहे. Redmi 9 Activ चे स्पेसिफिकेशंस नवीन रेडमी अॅक्टिव स्मार्टफोन ६.५ इंचाच्या एचडी प्लस डिस्प्ले सोबत 720 x 1600 रेजोल्यूशन येतो. यात फ्रंट कॅमेराच्यावर वॉटरड्रॉप नॉच आहे. या फोनमध्ये एक MediaTek Helio G35 SoC प्रोसेसर आहे. यात ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. युजर्स स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकतो. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १० वॉट चार्जिंग सपोर्ट करते. हा रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सोबत येतो. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन आउट ऑफ द बॉक्स एंड्रॉयड 11-आधारित MIUI 12 वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XXgYHm