Full Width(True/False)

भारतात आज लाँच होणार Poco C31, लाँचआधी समोर आले फोनचे स्पेसिफिकेशन्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco आज भारतात आपला बजेट स्मार्टफोन लाँच करणार आहे. आज दुपारी १२ वाजता या फोनला लाँच करण्यात येणार आहे. लाँचआधीच फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यावरून असे वाटत आहे की, गेल्या वर्षी लाँच भारतात लाँच करण्यात आलेल्या Poco C3 चा हा फोन सक्सेसर असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 SoC प्रोसेसर आणि 4GB RAM दिले जाणार आहे. Poco C31 फ्लिपकार्टवरून खरेदी करता येवू शकतो. ३ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान या फोनची विक्री केली जाणार आहे. Poco C31 स्पेसिफिकेशन्स (टीज) पोकोच्या वेबसाइटवर सध्या मायक्रोसाइटच्या माहितीनुसार, Poco C31 मीडियाटेक हीलियो जी35 एसओसी प्रोसेसर सोबत येईल. ४ जीबी रॅम सोबत जोडले जाणार आहे. यात फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक फीचर सुद्धा दिले जाणार आहे. याआधी पोको सी 3 सुद्धा चिपसेट आणि रॅम कॉन्फिगरेशनकडून संचालित करण्यात आला होता. Poco C3 ला भारतात ऑक्टोबर २०२० मध्ये लाँच करण्यात आले होते. यावरून असे सांगितले जात आहे की, Poco C31 चे Poco C3 चे अपडेट व्हर्जन असू शकते. पोकोच्या दाव्यानुसार, नवीन फोनची बॅटरी लाइफ मार्केट स्टँडर्ड पेक्षा २५ टक्के जास्त आहे. हे २.५ वर्षापर्यंत डेली यूज केल्यानंतर सुद्धा एकदम नवीन सारखा काम करेल. हा फोन थिक बॉटम आणि स्लिम साइट बेजल्स सोबत येईल. फोनमध्ये मिळणाऱ्या डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच डिझाइनचा आहे. पोकोच्या एका ट्विटमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे की, कंपनीने मायक्रोसाइटवर शेयर करण्यात आलेल्या फोटोच्या माहितीनुसार, Poco C31 मध्ये सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच मिळणार आहे. डिस्प्लेला स्लिम बेजल्स सोबत दाखवण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AVrywO