Full Width(True/False)

३० सप्टेंबरला येतोय POCO चा ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन, रियलमीला देणार जोरदार टक्कर

नवी दिल्ली : ने आपला नवीन POCO C31 ची घोषणा केली आहे. हा फोन ३० सप्टेंबरला दुपारी १२ वाजता भारतात लाँच होईल. कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. पोकोने दावा केला आहे की, हा फोन खूपच मजबूत असेल. सोबतच, सिक्योर आणि फास्ट असेल. फोन नॉच डिस्प्लेसह येईल. वाचा: संभाव्य किंमत स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सेलच्या माध्यमातून होईल. फोनची किंमत १० ते १५ हजार रुपये असेल. मात्र, अधिकृत किंमत लाँचिंगनंतरच समजू शकेल. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. हा फोन ६.५ इंच FHD+ डिस्प्लेसह येईल. POCO C31 चे स्पेसिफिकेशन्स POCO C31 स्मार्टफोनमध्ये रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोनमध्ये MediaTek Helio G८५ SoC चिपसेटचा सपोर्ट मिळेल. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. फोनबाबत अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही. POCO C31 स्मार्टफोनला आणि ला टक्कर देण्यास सादर केले जाईल. त्यामुळे पोकोच्या फोनमध्ये ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा मिळेल. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटचा सपोर्ट दिला जाईल. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uh4upz