Full Width(True/False)

Redmiचे दोन नवन स्मार्ट TV मॉडल्स भारतात २२ सप्टेंबरला होणार लाँच, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः शाओमी भारतात रेडमी स्मार्ट टीव्ही सीरीजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी २२ सप्टेंबर रोजी भारतात नवीन रेडमी टीव्ही सीरीज मॉडल लाँच करणार आहे. हे ऑल राउंड स्मार्ट इंटरनेटमेंट ऑफर करतील. कंपनीने आपल्या वेबसाइटवर नवीन टीव्ही मॉडलसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट सुद्धा बनवले आहे. या ठिकाणी याच्या फीचर्सची माहिती दिली आहे. रेडमी स्मार्ट टीव्ही सीरीज भारतात रेडमीकडून Smart TV X सीरीज नंतर दुसरी TV सीरीज असणार आहे. टीव्ही एक्स सीरीजला कंपनीने मार्च महिन्यात लाँच केले होते. शाओमीने ही माहिती दिली की, सीरीजला ३२ इंच आणि ४३ इंच साइज मध्ये लाँच करण्यात येईल. चे फीचर्स मायक्रोसाइटच्या माहितीनुसार, रेडमी स्मार्ट टीव्ही सीरीज अंतर्गत ३२ इंच आणि ४३ इंचाचे दोन मॉडल्स भारतात २२ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येतील. या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या टीझर इमेज स्लिमच्या टीव्हीला पाहू शकता. सोबत बॉटम मध्ये रेडमी ब्रँडिंग सुद्धा दिली आहे. या अपकमिंग टीव्ही सीरीज मध्ये शाओमीच्या या हाउस इमेज प्रोसेसिंग टेक्नोलॉजी विविड पिक्चर इंजिन दिली जाणार आहे. सोबत या ठिकाणी IMDB इंटीग्रेशन दिले जाणार आहे. हा टीव्ही अँड्रॉयड ११ बेस्ड पॅचवॉल ४ मिळणार आहे. या अपकमिंग टीव्ही मॉडल्स मध्ये डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस एक्स ऑडियोचा सपोर्ट पाहायला मिळणार आहे. दोनही टीव्ही मॉडल्स मध्ये ड्युअल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.० आणि ऑटो लो लेटेंसी मोड सुद्धा पाहायला मिळणार आहे. या अपकमिंग सीरीजची किंमत स्मार्ट टीव्ही एक्स सीरीजच्या तुलनेत कमी ठेवली जावू शकते. म्हणजेच आगामी टीव्ही हे स्वस्त किंमती मिळण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3khGaRk