Full Width(True/False)

Samsung Galaxy M52 अमेझॉनवर झाल लाँचिंग डेटचा खुलासा, मिळेल ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा

नवी दिल्लीः सॅमसंग भारतीय बाजारात आपला नवीन ५ जी फोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉनवर लिस्ट झाला आहे. याच्या लाँचिंगचा खुलासा करण्यात आला आहे. हा फोन २८ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. याआधी कंपनीने १९ सप्टेंबरला फोन लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. लाँच इव्हेंट १२ वाजेपासून सुरू करण्यात येणार आहे. Samsung Galaxy M52 चे संभावित स्पेसिफिकेशंस अमेझॉनच्या माहितीनुसार, हा एक स्लीम स्मार्टफोन आहे. याची रुंदी 7.4mm आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम ५२ स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले पाहायला मिळू शकतो. ज्यात सेल्फी कॅमेरासाठी पंच होल डिझाइन दिले जाणार आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080x2400 पिक्सल्स रिजोल्यूशन सोबत येईल. फोनमध्ये 6GB/8GB रॅम सोबत १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज पाहायला मिळू शकते. यात Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स मिळेल. सेल्फी आणि कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जावू शकतो. यात 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी 25W रॅपिड चार्जिंग सपोर्ट करणार आहे. काय असेल किंमत हा फोन पोलँडच्या एका रिटेलर वेबसाइटवर दिसला होता. वेबसाइटवर हा फोन १७४९ पोलीस ज्लॉटी (जवळपास ३३ हजार रुपये) किंमतीसोबत लिस्ट होता. ही किंमत फोनच्या ६ जीबी रॅम सोबत प्लस १२८ जीबी व्हेरियंटची होती. फोनला तीन कलर ऑप्शन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू कलर मध्ये आणले होते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CrRPTJ