मुंबई : मध्ये सहभागी झालेल्या याने रविवारी इन्स्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी देखील त्याच्यासोबत लाइव्ह होती. दोघांनी मिळून चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत संवाद साधला. राकेश आणि शमिता संवाद साधत असताना एक चाहत्याने राकेशला शमिताबद्दल एक चावट प्रश्न विचारला. काय विचारला प्रश्न यावेळी एका चाहत्याने चित्रकारही असलेल्या राकेशला प्रश्न विचारला की, 'जर शमिताला तुला पेंट करायचे असेल तर तू तिच्यासाठी काय व्हिज्युअलाईज करशील?' यावर राकेशने उत्तर दिले की, 'खरं तर हा प्रश्न अतिशय चावट आहे. परंतु मला असे वाटते की शमिता समुद्रकिनारी उभी आहे आणि तिच्या समोर अथांग समुद्र आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस उडत आहेत. मला असे वाटते की तिला समुद्र पाहताना मी वाळूवर तिचे चित्र काढू इच्छितो.' राकेशचे हे उत्तर ऐकून शमिता झाली इम्प्रेस राकेशने दिलेले हे उत्तर ऐकून शमिताही इम्प्रेस झाली. ती म्हणते की, 'वॉव.. हे खूपच सुंदर आहे...' राकेशमधील कोणती गोष्ट आपल्याला सर्वात जास्त भावते याबाबत तिने सांगितले की, 'राकेशचा साधेपणा... ही त्याची गोष्ट मला त्याच्याकडे जास्त आकर्षित करते.' राकेशने चाहत्यांना दिले सरप्राईजलाइव्ह सेशन संपतेवेळी राकेशने त्याच्या चाहत्यांना एक अनोखे सरप्राईज दिले. ते म्हणजे लाईव्ह सेशनवेळी राकेश आणि शमिता वेगवेगळ्या ठिकाणांहून जॉईन झाले आहेत, असे वाटत होते. परंतु हे सेशन संपत असताना राकेशने सांगितले की त्यांनी एकत्रितपणे हे सेशन केले. हे समजल्यानंतर एका चाहत्याने त्यांना विचारले की, 'ते दोघे एकत्र रहात आहेत का?' त्यावर शमिता जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, 'नाही नाही.' त्यावर राकेशनेही सांगितले की, 'आम्ही या लाईव्ह सेशनसाठी एकत्र आलो आहोत. त्याशिवाय काही नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ulNq1L