नवी दिल्लीः Xiaomi ने अधिकृतपणे आपली लेटेस्ट स्मार्टवॉच Watch Color 2 ला टीज केले आहे. ही नवीन स्मार्टवॉच २७ सप्टेंबर २०२१ रोजी लाँच करण्यात येणार आहे. ही कंपनीची लेटेस्ट स्मार्टवॉच असणार आहे. टीझर पोस्टर नुसार, शाओमीची वॉच कलर २ एक गोल डायलला सपोर्ट करणार आहे. ६ रंगाच्या पट्टीसोबत खरेदी साठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, कंपनी ऑनलाइन निवडीसाठी २०० हून जास्त डायल फेस आणणार आहे. पहिली वॉच कलर २०२० मध्ये आली होती. यात १.३९ इंचाचा अमोलेड डिस्प्ले सोबत लाँच करण्यात आले होते. जी १४ दिवसाची बॅटरी लाइफ सोबत आली होती. या व्हर्जनमध्ये ब्लूटूथ ५.० ,NFC, 5ATM वॉटर रेसिस्टेंट, आणि खूप सारे दिले आहेत. कंपीने अनेक कलर स्पोर्ट व्हेरियंट सुद्धा लाँच केले आहे. जे जीपीएस कार्यक्षमता आणि ब्लड ऑक्सिजनला मॉनिटर करतात. आपण अपेक्षा करू शकतो की, Watch Color 2 मध्ये पहिली वॉचसारखी Watch Color आहे. यात फक्त काही साध्या सुधारणा करून आणले जाणार आहे. परंतु, ब्रँड ने अजून या स्मार्टवॉच संबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. २७ सप्टेंबर रोजीच्या इव्हेंटमध्ये Xiaomi CIVI स्मार्टफोन, Xiaomi True Wireless Noise Canceling Earphones आणि अन्य प्रोडक्ट्सच्या घोषणेचा समावेश असेल. यासाठी अधिक माहितीसाठी वाट पाहणे उचित ठरणार आहे. कारण, लाँचिंग इव्हेंट आणि त्याच्या अधिकृत रिलीज आधी कोणत्याही नवीन टीजरला कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lWCLHc