Full Width(True/False)

33W फास्ट चार्जिंगचा पोकोचा नवा स्मार्टफोन येतोय, सर्टिफिकेशन वेबसाइट पर लिस्ट, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः शाओमीचा सब ब्रँड, पोको लवकरच एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. पोकोने M3 Pro 5G नावाचा स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी जून मध्ये लाँच केला होता. आता अनेक टिप्स्टर्संच्या म्हणण्यानुसार, पोको ब्रँड लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करू शकतो. जाणून घ्या 5G संबंधी. Poco M4 Pro 5G लाँचिंगच्या मार्गावर पोकोच्या या नवीन स्मार्टफोनला अनेर बेंचमार्किंग आणि सर्टिफिकेशन साइट्सवर पाहिले गेले आहे. ज्यात युरेशियन इकोनॉमिक कमिशन (EEC) आणि कम्पल्सरी सर्टिफिकेट ऑफ चाइना (3C) च्या लिस्टिंगचा समावेश आहे. एका प्रसिद्ध टिप्सटरच्या म्हणण्यानुसार, Poco M4 Pro 5G स्मार्टफोन ला EEC, 3C, IMEI आणि TENAA सर्टिफिकेशन साइट्सवर सर्वात आधी पाहिले गेले आहे. या सर्व साइट्सवर या स्मार्टफोनचे मॉडल नंबर 21091116AC देण्यात आले आहे. टिप्स्टर Kacper Skrzypek च्या माहितीनुसार, Poco M4 Pro 5G ची बॅटरी खूपच दमदार असणार आहे. हे 5G स्मार्टफोन 33W च्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येणार आहे. Poco M4 Pro 5G स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चा एक जबरदस्त अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. एक मीडियाटेक प्रोसेसर वर चालणारा आहे. या फोनच्या फीचर्स संबंधी जास्त माहिती समोर आली नाही. परंतु, या नवीन स्मार्टफोनमध्ये Poco M3 Pro 5G चा 48MP चा मेन कॅमेरा 6,000mAh ची बॅटरी आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yl75mM