नवी दिल्लीः प्रत्येक टेलिकॉम कंपनीचा हाच प्रयत्न राहतो की, रिचार्ज प्लान्समध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त बेनिफिट्स द्यायला हवेत. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे प्लान जवळपास एकसारखेच आहेत. परंतु, यात थोडा फरक असतो. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एका अशा प्रीपेड रिचार्ज प्लान संबंधी माहिती देत आहोत, या तीन टेलिकॉम कंपन्यांत ३९९ रुपये आहे. आता तुम्हीच ठरवा कोणता प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. रिलायन्स जिओचा ३९९ रुपयाचा प्लान जिओचा ३९९ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. सोबत जवळपास जिओच्या प्लान प्रमाणे यात सुद्धा जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सावन, आणि जिओ क्लाउड सारखे जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. हा प्लान ५६ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. एअरटेलचा ३९९ रुपयाचा प्रीपेड प्लान एअरटेल आपल्या ३९९ रुपयाच्या प्रीपेड प्लानमध्ये ५६ दिवसाच्या वैधते सोबत अनलिमिटेड कॉलिंग, रोज १.५ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस ऑफर करीत आहे. सोबत एअरटेल एक्स ट्रिम प्रीमियम अॅप, विंक म्यूझिक आणि हेलो ट्युन्सचे फ्री अॅक्सेस, २८ दिवसासाठी शॉ अकादमी मध्ये फ्री ऑनलाइन कोर्सेस, फोनसाठी अँटी व्हायरस आणि FASTag च्या खरेदीवर १५० रुपयाचा कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. एअरटेलने सायबर सिक्योरिटी फर्म Kaspersky सोबत पार्टनरशीप केली आहे. यामुळे फोन सुरक्षित ठेवता येतो. वोडाफोन आयडियाचा ३९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, आणि रोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये तुम्हाला वोडाफोन प्ले सर्विस, डेटा रोलओवर, नाइट बिंजची सुविधा आणि झी५ अॅप आणि व्ही मूव्हीज अँड टीव्ही अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानमध्ये ५६ दिवसाची वैधता मिळते. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्याचे ३९९ रुपयाचा प्लान आहेत. आता तुम्ही ठरवा कोणता प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. वाचा : वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AirxC8