मुंबई : बॉलिवूडचा बादशाह गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आला आहे. बॉलिवूडमध्ये शाहरुख सगळ्यात व्यग्र असा अभिनेता आहे. एकाचवेळेला शाहरुख अनेक प्रोजेक्टवर काम करत असतो. त्यामुळे त्याचा संपूर्ण दिवस हा खूपच धावपळीचा, घाईगडबडीचा असतो. मुलांना भेटण्यासाठी अपॉइंटमेन्ट घ्यावी लागते. ही माहिती इतर कुणी नाही तर खुद्द शाहरुख खानच्या मुलाने, आर्यननेच दिली आहे. ड्रग्ज घेतल्याप्रकरणी याला शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. आर्यनसोबत आणखी आठ जणांनाही अटक केली. सध्या आर्यनसह आणखी दोघांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ड्रग्ज बाळगणे आणि त्याचे सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. चौकशीवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना अनेक गोष्टी आर्यनने सांगितल्या. अधिकाऱ्यांनी त्याचा चार पानांचा जबाबही नोंदवला आहे. यावेळी आर्यनने सांगितले की, 'माझे पप्पा शाहरुख खान खूपच बिझी असतात. ते सध्या एकाचवेळी तीन सिनेमांचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा संपूर्ण दिवस खूपच धावपळीचा असतो. त्यामुळे मला जर त्यांना भेटायचे असेल तर त्यांची मॅनेजर पूजा हिच्याकडून अपॉइंटमेन्ट घ्यावी लागते.' आर्यनने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना हे देखील सांगितले आहे की त्याने परदेशातून फिल्ममेकिंगचा कोर्स पूर्ण केलेला आहे. आर्यनला सोमवारी एनसीबीने न्यायालयात हजर केले, त्यावेळी आर्यनच्या मोबाईमधून काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हॉटअॅप चॅट मिळाले आहेत. एनसीबीने असा दावा केला आहे की, आर्यन खान गेल्या चार वर्षांपासू ड्रग्ज घेत आहे. इतकेच नाही तर आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून पैसे देवाण-घेवाणीबाबत संभाषण आहे. तसेच त्याने युके आणि दुबईमध्येही ड्रग्ज सेवन केले होते. एनसीबीने केलेले हे दावे जर खरे ठरले तर आर्यनच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यनने कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी त्याचा नोजल स्प्रे मागितला होता. त्याची ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे. एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. एनसीबीने कोर्टात सांगितले की, या सगळ्यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uIOTQb