Full Width(True/False)

BBM3: वाईल्ड कार्डद्वारे छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री करणार बिग बॉसच्या घरात प्रवेश

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी ३' हा कार्यक्रम सुरू होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. कार्यक्रमातून आतापर्यंतअक्षय वाघमारे, सुरेख कुडची, आदिश वैद्य या तिघांना बाहेर पडावे लागले आहे. तर कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आज कार्यक्रमातून आणखी एक सदस्याचे नॉमिनेशन होऊन त्याला घराच्या बाहेर पडावे लागणार आहे. त्याचबरोबर आणखी एक सदस्य वाईल्ड कार्डच्या माध्यमातून घरात प्रवेश करणार आहे. वाईल्ड कार्डद्वारे घरात प्रवेश करणा-या सदस्याचा एक व्हिडिओ निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल आहे. अर्थातच या व्हिडिओमधून ही अभिनेत्री कोण आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ही अभिनेत्री करतेय बिग बॉस मराठी ३च्या घरात प्रवेश खरे तर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी ३ मध्ये अभिनेता आदिश वैद्य याने वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री केली होती. मात्र केवळ तीन आठवड्यातच तो घराबाहेर पडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये होणार आहे. ही व्यक्ती म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आहे. 'बिग बॉस'मराठीमध्ये एन्ट्री करणार असल्याचे सूतोवाच नीताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीव्दारे केले आहे. नीताने स्वतःचा एक फोटो शेअर करत बिग बॉसच्या लोगो पोस्ट केला आहे. आणि सोबतचं 'आय एम वेटिंग' असे म्हटले आहे. कलर्स वाहिनीने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक अभिनेत्री बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री डान्स करताना दिसत आहे. मात्र ती पाठमोरी असल्याने ती कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. परंतु ही अभिनेत्री नीता शेट्टीच असल्याचा दावा काही युझर्सनी केला आहे. नीता शेट्टी बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाल्यानंतर तिथले स्पर्धक तिचे स्वागत कसे करतात, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, बिग बॉस मराठी ३ चे घर स्पर्धकांच्या वादविवादांनी, टास्कवेळी होणा-या हाणामारीमुळे चांगलेच दणाणून गेले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने या स्पर्धकांमध्ये खटके उडतच आहेत. घरामध्ये जरी दोन ग्रुप असले तरी त्यांच्यातही धुसफूस सुरू आहे. एकमेकांवर त्यांचा विश्वास नाही. विशेष करून गायत्री आणि मीरा यांच्यामध्ये जय आणि उत्कर्ष हे स्नेहाला झुकते माप देत असल्याबद्दल अढी आहे. त्यामुळे या दोघींनी त्यांच्याबद्दल विश्वास नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून सातत्याने दिसते. तर दुस-या ग्रुपमध्ये विकास आणि विशाल यांच्यात टास्कवेळी जोरदार भांडण झाले. यामुळेबिग बॉसच्या घरातील जय आणि विरूची जोडी तुटली आहे. अशातच आता घरामध्ये सदस्याची एन्ट्री झाल्याने वातावरणात काय बदल होणार? किंवा ही नवी स्पर्धक कोणती टीम निवडणार आणि कोणत्या टीममधून खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GAhxID