मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात फिट असलेली अभिनेत्री कायम तिच्या चाहत्यांना प्रेरणा देत असते. शिल्पा शेट्टीचा फॅशन सेन्स, तिचा स्टायलिस्ट अंदाज हे सगळे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. शिल्पा अनेकदा तिच्या लूकवर विविध प्रयोग करत असते आणि त्याचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील शिल्पाने अलिकडेच स्वतःचा मेकओव्हर केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. शिल्पाचा न्यू हेअर कट शिल्पाने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये शिल्पा जिममध्ये दिसत आहे. जिममधील वर्कआऊट सुरू करण्याआधी शिल्पा तिचे केस बांधताना दिसत आहे. त्यावेळी तिचा नवीन हेअरकट दिसत आहे. या व्हिडिओम्ये शिल्पाने मानेच्यावरचे केस पूर्णपण काढून टाकले आहेत... व्हिडिओ शेअर करत शिल्पाने लिहिले आहे... जिममधील हा व्हिडिओ शेअर करत शिल्पाने एक मोठी पोस्ट लिहिले आहे की, 'तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडू शकत नाहीत. मग ते अंडरकट बझकट (खरेच सांगते यासाठी खूप हिंमत लागते...) असो वा माझा नवीन एरोबिकचा वर्कआऊट;'ट्रायबल स्क्वैट्स'' शिल्पाचा हा नवा हेअर कट चांगलाच चर्चेत आला आहे. तिच्या या अनोख्या हेअर कटवर युझर्सने मात्र अतरंगी अशा कॉमेन्ट केल्या आहेत. युझर्सच्या अतरंगी कॉमेन्ट्स शिल्पा शेट्टीचा हा अंडरकट बज कट हेअर स्टाईल काही युझर्सना आवडला आहे. ते त्यांच्या कॉमेन्टमधून त्याबद्द व्यक्त होत आहेत.तर तर काहींनी मात्र कॉमेन्ट करत शिल्पाची टिंगल केली आहे. एका युझरने म्हटले आहे की,'हे अजिबात चांगले दिसेत नाही.'आणखी एका युझरने लिहिले आहे की, 'ही तर अर्धी टकली दिसते आहे....' तर आणखी एका युझरने लिहिले आहे की, 'तिरुपतीला जाऊन केस काढले आणि वरून विग घातला आहे का.' तर आणखी एका युझरने विचारले की, 'तुमचे पती कसे आहेत?' तर आणखी एका युझरने विचारले की,'राज कुंद्राची काय हालहवाल आहे?' दरम्यान, शिल्पाचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाख ६२ हजाराहून अधिक युझर्सने लाईक केले आहे. आणखी एक व्हिडिओ केला शेअर दरम्यान, जिममधील शिल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिने अंडरकट बज कट हेअर स्टाईल करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3n9fdPL