Full Width(True/False)

दिग्दर्शक म्हणतो- लग्न 'मृत्यू' तर घटस्फोट 'पुनर्जन्म'

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सामंथा अक्किनेनी व अभिनेता यांच्या घटस्फोटावर नुकतीच टिप्पणी केली. त्यांनी म्हटलेय की, 'घटस्फोट हा लग्नाच्या तुलनेत अधिक साजरा केला गेला पाहिजे. त्याचं एक कारणही आहे.' त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलेय की, 'घटस्फोट लग्नापेक्षा अधिक साजरा व्हायला हवा, कारण लग्नामध्ये तुम्हाला ठावूक नसते की, तुम्ही काय करत आहात, मात्र घटस्फोट घेताना तुम्ही लग्नातून जे प्राप्त केलेले असते, त्यातून बाहेर पडत असता.' त्यांनी आपल्या अनेक ट्वीटपैकी एकात म्हटले की, 'लग्न ही नरकात ठरली जातात तर घटस्फोट स्वर्गात ठरले जातात.' आरजीव्ही यांनी म्हटले की, 'लग्नातील संगीत सोहळ्यात बदल करण्याची वेळ आली आहे. तसे पाहायला गेले तर बहुतांश लग्न हे जितके दिवस समारंभ साजरा करतात त्या संख्येपेक्षा अधिक चालत नाही, आणि त्यामुळे हा संगीत सोहळा एखाद्या घटस्फोटाच्या ठिकाणी व्हायला हवा, जिथे घटस्फोटीत पुरुष व महिला गाण्यासोबतच नाचूही शकतील.' शनिवारी, सामंथा व नागा चैतन्य यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'आम्ही दोघांनी आपापल्या मार्गाने जाण्यासाठी' विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.' 'कठीण काळात' गोपनीयता राखण्याची विनंती करत त्यांनी लिहिले की, 'आम्ही खरंच भाग्यशाली आहोत की आम्ही एक दशकाहून अधिक काळ मित्र होतो, जे आमच्या नात्याचे मूळ होते. आम्हाला विश्वास आहे की, आमच्यात एक विशेष नाते नंतरही अबाधित राहील.' अभिनेता नागा चैतन्यचे वडील व सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन अक्किनेनी यांनी देखील सामंथा व नागा चैतन्यच्या दुर्देवी विभाजनाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, 'त्यांचे कुटुंब सामंथासोबत व्यतीत केलेल्या सर्व क्षणांना आठवणीत ठेवेल.' नागार्जून यांनी लिहिलेय की, 'सामंथा व चैतन्य यांच्यात जे घडले ते दुर्भाग्यपूर्ण आहे. एक पती-पत्नी यांच्यात जे काही होते ते त्यांच्यातील वैयक्तिक आहे. चैतन्य व सामंथा हे दोघेही मला प्रिय आहेत. माझे कुटुंब सामंथासोबत व्यतीत केलेले सर्व क्षण आठवणीत ठेवेल आणि ती आम्हाला नेहमीच प्रिय असेल. देव त्या दोघांना शक्ती देवो.' सामंथा आणि नागा चैतन्य यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये 'ये माया चेसावे', 'ऑटोनगर सूर्या' आणि 'मजिली' या चित्रपटांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये या दोघांनी राजेशाही थाटात लग्न केलं होतं. सामंथा हिने आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अक्किनेनी आडनाव काढून तिचं मारेच नाव सामंथा रुथप्रभू असं ठेवलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ylan9l