मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यनला जामीन मंजूर झाल्याने गौरी, शाहरुख खान आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबरोबच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आर्यनला जामीन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आर्यनला खानला जामीन मिळाल्याची बातमी समजल्यावर अभिनेता याने लगेचच त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे की, 'काळ जेव्हा न्याय देतो तेव्हा पुराव्यांची गरज लागत नाही...' हिने देखील आर्यनला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर तिचे मत व्यक्त केले आहे. स्वराने एका शब्दाच तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'अखेर...' असे तिने लिहिले आहे. https://twitter.com/ReallySwara/status/1453684048165965830?s=20 सर्वात भावूक प्रतिक्रिया अभिनेता आर. माधवन याने व्यक्त केली आहे. माधवन याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'देवाची कृपा आहे. एक वडील असल्याच्या नात्याने किती दिलासा मिळाला असेल, हे मी समजू शकतो. देवाच्या कृपेने आता सर्व गोष्टी चांगल्या आणि सकारात्मक होतील.' राम गोपाल वर्मा यांनी सरळ सरळ आर्यनचा खटला लढणारे आधीच्या वकीलांची तुलना त्यांनी वकील मुकुल रहतोगी यांच्याशी केली आहे. त्याने तर थेट पहिल्या वकीलांच्या योग्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, आर्यन खानला मुंबईहून गोव्याकडे जाणा-या क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टीमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्याला अटक केल्यानंतर त्याचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी असल्याचा संशय एनसीबीने व्यक्त केला होता. त्यामुळे सत्र न्यायालयात त्याचा जामीन मंजूर झाला नाही. त्यानंतर आर्यनच्या वकीलांना मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती नितिन सांब्रे यांच्या समोर या खटल्याची सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर गुरुवारी आर्यनला जामीन मंजूर झाला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nxonpq