नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत अनेक प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. जर तुम्हाला Amazon Prime सारखी मेंबरशीप हवी असेल तर त्यासाठी प्लान थोडा महाग खरेदी करावा लागतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एअरटेलचा असा एक प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्याला तुम्ही ३५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत डेटा आणि कॉलिंग सोबत Amazon Prime मेंबरशिप सुद्धा मिळते. जाणून घ्या यासंबंधी. Airtel चा ३४९ रुपयाचा प्लान एअरटेलचा ३४९ रुपयाचा प्लान मध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. यात ग्राहकांना रोज २.५ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे एकूण डेटा ७० जीबी मिळतो. यात ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. या प्लानछे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानमध्ये सुद्धा फ्री दिली जाते. याशिवाय, तुम्हाला फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक, आणि Apollo 24/7 Circle ची फ्री मेंबरशीप दिली जाते. Jio चा ३४९ रुपयाचा प्लान रिलायन्स जिओचा ३४९ रुपयाचा प्लान सुद्धा २८ दिवसाची वैधता सोबत येतो. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलंग आणि रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन प्लानमध्ये दिले जाते. जिओच्या या प्लानमध्ये अमेझॉन किंवा अन्य OTT प्लॅटफॉर्मची मेंबरशीप दिली जात नाही. कोणत्या प्लानमध्ये किती फायदा जर आम्ही एअरटेल प्लानची जिओशी तुलना केली तर जिओच्या प्लानमध्ये तुम्हाला १४ जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करीत आहे. दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सोबत सारखीच वैधता मिळते. एअरटेल प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime ची मेंबरशीप अतिरिक्त दिली जाते. त्यामुळे युजर्संसाठी ही एक जबरदस्त ऑफर होवू शकते. वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bql0qp