नवी दिल्ली : ऑडिओ ब्रँड Boult ने शोधणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन बड्स लाँच केले असून हे डिव्हाइस Active Noise Cancellation समर्थनासह येतात. एवढेच नव्हे तर बड्स इतर अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. तुम्हाला नवीन बड्स खरेदी करायचे असल्यास Boult चे TWS एक चांगला पर्याय ठरू शकतात. वाचा: Boult Audio AirBass SoulPods वैशिष्ट्ये : वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, १० mm ड्रायव्हर्ससह शक्तिशाली आवाज देण्यासाठी लाँच केले गेले आहे. अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर व्यतिरिक्त, बड्स अॅम्बियंट मोडसह देखील येतात, हे वैशिष्ट्यआवश्यक असेल तेव्हा सभोवतालचा आवाज ऐकण्यासाठी वापरले जाते. कंपनीचे म्हणणे आहे की, बड्सचा पाण्यापासून आणि घामापासून बचाव करण्यासाठी बड्स एबीएस शेलपासून बनविण्यात आले आहे. तसेच, त्यांना सॉफ्ट सिलिकॉन टिप्ससह सादर करण्यात आले आहे. ब्लूटूथ सपोर्ट व्यतिरिक्त, बोल्ट ऑडिओ एअरबेस सोलपॉड्समध्ये टच-फीचर देखील आहे, ज्याच्या मदतीने युजर्स सहजपणे आवाज समायोजित करू शकतात, संगीत नियंत्रित करू शकतात, कॉलला उत्तर देऊ शकतात किंवा नाकारू शकतात. पाऊस, पाणी आणि घामापासून मर्यादेपर्यंत संरक्षण करण्यासाठी IPX7 रेटिंगसह येतो. डिव्हाइस चार्जिंग केससह २४ तासांचा प्लेटाईम देतातबड्स यूएसबी टाइप-सी द्वारे टाइप-सी फास्ट चार्जिंगला समर्थन देतात. Boult Audio AirBass SoulPods ची भारतातील किंमत: हे नवीन Boult TWS Earbuds २,४९९ रुपयांच्या प्रास्ताविक किंमतीसह लाँच करण्यात आले आहे. परंतु, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर बड्स २,९९९ रुपयांच्या किंमतीसह विकण्यात येत आहेत. फ्लिपकार्टवर तुम्ही ते २,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. बड्स आणि पांढऱ्या रंगांमध्ये उपलब्ध असून ते १ वर्षाच्या वॉरंटीसह येतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DaFbJd