Full Width(True/False)

हॅलोविनसाठी परीच्या वेशात दिसली विराट-अनुष्काची लेक, फोटो व्हायरल

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या दुबईमध्ये आहेत. सध्या टी२० क्रिकेट वर्ल्ड कप सुरू असल्याने प्रत्येक क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासोबत दुबईत आहे. अशात दिवाळीपूर्वी सर्व क्रिकेटपटूंनी मिळून दुबईच्या हॉटेलमध्ये हॅलोविन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला सर्व क्रिकेटपटूंची मुलं वेगवेगळ्या वेशात दिसून आली. त्यात अनुष्का आणि विराट यांची मुलगी देखील हटके अवतारात दिसली. क्रिकेटपटूंच्या मुलांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत. या हॅलोविन पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये विराट आणि अनुष्का यांची लेक वामिका परीच्या वेशात दिसून आली. तिने डोक्यावर युनिकॉर्नच्या शिंगाचा हेअरबॅण्ड लावला आहे. केसांच्या दोन पोनीतेल बांधल्या आहेत आणि गुलाबी रंगाचा परीचा वेश परिधान केला आहे. तर या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टैनकोविक यांचा मुलगा अगत्यादेखील भूत बनलेला दिसत आहे. तर रोहित शर्माची मुलगी समायरा आणि आर अश्विनच्या मुली आद्या आणि अकीरा देखील हटके अवतारात दिसत आहेत. सगळी मुलं मिळून चॉकलेट गोळा करत आहेत आणि वामिकासाठी विराट चॉकलेट मिळवत आहे. हे फोटो चाहत्यांना प्रचंड पसंत पडले असून नेटकऱ्यांनी निरनिराळ्या कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने म्हटलं, 'किती गोड आहे हे सगळं. सगळे एकत्र खेळतायत.' या फोटोंवरून काही चाहते वामिका नक्की कोणासारखी दिसणार याचा अंदाज लावत आहेत. याच वर्षी जानेवारी महिन्यात अनुष्काने वामिकाला जन्म दिला होता. अनुष्का आणि विराट यांनी वामिकाचा चेहरा कॅमेरापासून जाणीवपूर्वक दूर ठेवला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mxaNDa