Full Width(True/False)

जितकं भुंकायचं भुंका पण माझ्या मुलीबद्दल बोलाल तर...; काम्या पंजाबी भडकली

मुंबई- छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हिने नुकतीच एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. काम्याने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. काम्याने निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. परंतु, काम्याला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. कार्यक्रमात निया शर्मा बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंग बद्दल बोलली असता काम्यानेही तिला आलेले अनुभव सगळ्यांसोबत शेअर केले. काम्याने ट्रोलर्सना त्यांच्याच शब्दात उत्तर देत चांगलंच सुनावलं. कार्यक्रमात बोलताना काम्या प्रचंड भावनिक झाली होती. काम्या म्हणाली, 'माझ्या पहिल्या लग्नात मला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. माझं पहिलं लग्न तुटलं. जेव्हा मी त्या लग्नाच्या बेडीतुन बाहेर पडले तेव्हा मला खूप ट्रोल केलं गेलं. त्यानंतर मी एका व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये होते. तेव्हाही मला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केलं गेलं. तू तर म्हातारी आहेस, तुझा तर घटस्फोट झालाय, तुला तर हा माणूससुद्धा सोडून जाईल, असं म्हणायचे. इतकच नाही तर तू तुझ्या मुलीलादेखील विकून टाकशील असं म्हणायचे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करायचे.' त्यानंतर काम्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. काम्या पुढे म्हणाली, 'माझ्या पाच वर्षाच्या मुलीला देखील ट्रोलर्स निशाणा बनवत होते. आता ती ११ वर्षांची आहे पण आजतागायत माझ्या मुलीला ट्रोल केलं जातं. माझं आयुष्य आहे, माझी मर्जी मी ते कसं जगायचं. तुम्हाला जेवढं भुंकायचंय तुम्ही भुंका, मला फरक पडत नाही. पण गोष्ट जेव्हा माझ्या मुलीची असेल तेव्हा मी जाऊन त्यांचा गळा चिरून टाकेन. मी ते खपवून घेणार नाही.' एरवी बिनधास्त असणारी काम्या तेव्हा आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी पुढे सरसावलेली दिसली. तिच्यातील आई जणू मुलीच्या रक्षेचं वचन देत ट्रोलर्सना आव्हान देत होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nLJCnO