Full Width(True/False)

जिंकलंस! टास्कसाठी टक्कल करणाऱ्या धाडसी मीनलवर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव

मुंबई- छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारा कार्यक्रम '' सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो आहे. घरात दिले जाणारे टास्क प्रेक्षकांना पसंत पडत असून त्यात वरचढ ठरण्यासाठी सदस्यांची होणारी धावपळ प्रेक्षकांना आवडत आहे. बिग बॉसच्या घरात नुकतंच 'संयमाची ऐशी तैशी' हा टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये एक टीम राक्षस बनली होती तर दुसरी टीम देवदूत बनली होती. यात राक्षस देवदूतांना काम सांगणार आणि ती कामं देवदूतांनी पूर्ण करायची होती. मात्र ही कामं करताना देवदूतांच्या चेहऱ्यावर हास्य असणं खूप महत्वाचं होतं. या टास्कदरम्यान हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. टास्कमध्ये मीरा राक्षस बनली होती तर मीनल देवदूत होती. त्यामुळे मीराने मीनलला टास्कमधून बाहेर काढण्यासाठी तिचे केस कापण्याचा आदेश दिला. ट्रीमरने सगळे केस काढून टक्कल करायचं असं मीराने मीनलला सांगितलं. त्यावर मीनलने देखील हार न मानता टक्कल करण्याची तयारी दर्शवली. मीनल टक्कल करणार एवढ्यात मीराने तिला थांबवलं. मात्र मीनलच्या या धाडसीपणाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. मीनलने जराही न डगमगता मीराचं आव्हान स्वीकारलं आणि ते पूर्ण करण्याची धमक दाखवली याबद्दल नेटकरी मीनलचं भरभरून कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'जिंकलीस. तुझा खेळ पाहून खूप छान वाटलं. तू एकटी तिथे सगळ्यांवर भारी पडतेस.' आणखी एका युझरने लिहिलं, 'मीनलने जेवढ्या धाडसाने हे आव्हान स्वीकारलं त्याला सलाम. एखाद्याने कितीवेळ विचार केला असता. पण मीनल तू ग्रेट आहेस.' तर दुसरीकडे मीराने असं अतरंगी काम दिल्याने नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एक मुलगी असून दुसऱ्या मुलीला तिचे केस काढायला लावते हे चूक आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी मीरावर राग व्यक्त केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pP3yIP