नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजमध्ये सहभागी होऊन १ हजार रुपये जिंकण्याची संधी मिळत आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाते व बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला केवळ ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीस जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ अॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. यूजर्स अॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये भाग घेऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होऊ शकतात. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २७ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. ३० सप्टेंबर हा सेंट जेरोमी यांच्या मेजवानीचा दिवस २०१७ सालापासून संयुक्त राष्ट्राने कोणता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून स्विकारला? उत्तर – इंटरनॅशनल ट्रांसलेशन डे २. काही दिवसांपूर्वी डेव्हिड वॉर्नरला सनरायझर्स हैद्राबादच्या संघातून वगळ्यात आले होते. त्याच्या जागी सलामीला कोण आले होते? उत्तर – जेसन रॉय ३. रोहित शेट्टीचा सुर्यवंशी हा चित्रपट २०२१ मध्ये कोणत्या सणादरम्यान रिलीज होणार आहे? उत्तर – दिवाळी ४. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यभागी येतो, त्या घटनेला काय म्हणतात? उत्तर – सूर्यग्रहण (Solar Eclipse) ५. जर संपूर्ण गेम ४ क्वार्टरमध्ये समाप्त होत असल्यास एनबीएमध्ये एक क्वार्टर किती वेळ चालेल? उत्तर – १२ मिनिटे वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vIJlWi