Full Width(True/False)

मह्या भीमानं सोन्यानं भरलिया ओटी...गाणं गाणाऱ्या गायिकेला मिळालं हक्काचं घर

मुंबई : गायिका सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गाण्याचे व्हिडिओ अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेल्या गीतांचे गायन करणाऱ्या कडुबाई खरात यांना राहण्यासाठी हक्काचं घर नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना घर देण्याची घोषणा केली होती. या घोषणेची वचनपूर्ती करण्यात आली असून, सोमवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता पटोले यांच्या उपस्थितीत खरात स्वत:च्या घरात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही महिन्यांपूर्वी कडुबाई खरात यांच्या राहत्या घरावर हतोडा पडला होता. त्यामुळं त्यांना राहण्यासाठी स्वत:चं असं घर नव्हतं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना घर देण्याची घोषणा केली होती.या घोषणेनंतर कडुबाई खरात यांना काही महिन्यातच त्यांचं घर मिळालं आहे. जीवनवैभव नगर इथं हे घर देण्यात आलं आहे. कोण आहेत कडुबाई खरात? काही महिन्यांपूर्वी कडुबाई खरात यांनी गायलेलं 'मह्या भीमानं सोन्यानं भरलिया ओटी...' हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. कडुबाई गाणी गात असल्या तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचं गायनाचं शिक्षण घेतलेलं नाहीए. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कडुबाईंच्या मनात प्रचंड आदर आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Ccrp8K