नवी दिल्लीः Xiaomi CIVI, Mi CC9 सीरीज नंतर लाइफस्टाइल स्मार्टफोन्समध्ये कंपनीचा दुसरा प्रयत्न आहे. या डिव्हाइस ने आपल्या पहिल्या विक्रीत फक्त ५ मिनिटात २०० मिलियन युआन म्हणजेच २३० कोटीहून जास्त कमाई केली आहे. उद्या Xiaomi च्या अधिकाऱ्यांपैकी एकाने या फोनच्या विक्री संबंधी माहिती शेअर केली आहे. शाओमी मध्ये अनेक पदावर काम करणाऱ्या लू वेईबिंग यांनी खुलासा केला आहे की, TMall वर ची विक्री २०० मिलियन युआन हून जास्त झाला आहे. ही आकडेवारी २३०० ते ३००० युआन हँडसेटमध्ये आहे. हा फोन विक्रीत पहिल्या नंबरवर आहे. मुलींचा पहिली पसंत बनला Xiaomi CIVI सर्वात महत्त्वाचे म्हणजे ६० टक्क्यांहून जास्त खरेदी करणाऱ्यांत महिलांचा समावेश आहे. शाओमीच्या माहितीनुसार, शाओमीकडून जारी करण्यात आलेल्या स्मार्टफोन विरूद्ध आहे. Mi 11 Lite आणि Xiaomi 11 Lite NE ला या फोनच्या सर्वात जवळचे मानले जाते. कारण, तिन्ही लाइफ स्टाइल स्मार्टफोन आहेत. शानदार आहे डिझाईन CIVI मध्ये मेटल फ्रेम, कर्व्ड डिस्प्ले आणि AG ग्लास सोबत एक प्रीमियम डिझाइन आहे. परंतु, दुर्दैवाने याचा रियर कॅमेरा लेआउट विवोची कॉपी केल्यासारखा वाटतो. Xiaomi CIVI ची किंमत सुद्धा जास्त नाही. यासाठी या फोनला खूप पसंत केले जात आहे. Xiaomi CIVI ची किंमत 8GB + 128GB स्टोरेज ची किंमत - २,५९९ युआन (३० हजार २५ रुपये) 8GB + 256GB स्टोरेजची किंमत- २,८९९ युआन (३३ हजार ५२६ रुपये) 12GB + 256GB स्टोरेज ची किंमत -३,१९९ युआन (३६ हजार ९५३ रुपये) वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yo3B3k