Full Width(True/False)

९४ रुपयात ७५ दिवसाची वैधता, डेटा-कॉलिंगसोबत मिळतात हे शानदार बेनिफिट्स

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळे प्लान ऑफर करते. युजर्संना कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिट्स उपलब्ध करीत आहे. कंपनी स्वस्त किंमतीतील प्लान आणून io, Airtel, Vi ला टक्कर देत आहे. कंपनी आपल्या युजर्संना एकापेक्षा एक प्लान्स लाँच करीत आहे. सोबत अनेक प्लान्समध्ये बदल करीत आहे. कंपनीने असे काही केले आहे की, कंपनीने ग्राहकांसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्लान आणत आहे. ज्यात युजर्संना ७५ दिवसाची मोठी वैधता दिली जात आहे. सोबत अनेक बेनिफिट्स सुद्धा दिले जात आहे. जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर या प्लानची माहिती तुमच्याकडे असायला हवी. जाणून घ्या डिटेल्स. BSNL चा ९४ रुपयाचा रिचार्ज प्लान या प्लानची किंमत ९४ रुपये आहे. यात युजर्संना ७५ दिवसाची वैधता मिळते. सोबत ३ जीबी डेटा मिळतो. हा डेटा ७५ दिवसात कधीही यूज करता येतो. याशिवाय, युजर्संना व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. परंतु, ही अनलिमिटेड नाही. यात कॉल करण्यासाठी १०० मिनिट्स फ्री दिले जाते. १०० मिनिट्स तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर बोलू शकता. फ्री मिनिट्स संपल्यानंतर युजर्संना ३० पैसे प्रति मिनिट चार्ज द्यावा लागतो. याशिवाय, या प्लानमध्ये लोकल व राष्ट्रीय रोमिंगचा लाभ दिला जातो. फक्त कॉलिंग, डेटा, वैधता नाही तर या प्लानमध्ये पर्सनलाइज्ड रिंग बँक टोन ची सुविधा सुद्धा दिली जाते. ही सुविधा फक्त ६० दिवसांसाठी वैध आहे. वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YmcYQu