Full Width(True/False)

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके मोठ्या पडद्यावर; 'पांडू'च्या टीझरची चर्चा

मुंबई :वर्षाच्या सुरुवातीला '' सिनेमाची घोषणा झाली आणि तेव्हापासून 'पांडू' नेमकं कोण साकारणार या चर्चेला उधाण आलं होतं. पण खास 'मुंटा'च्या वाचकांसाठी आपण हे गुपित उघड करतोय. विनोदवीर 'पांडू'च्या भूमिकेत तर ''च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. गेली अनेक वर्षं भाऊ आणि कुशलची जोडी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आता हीच जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी झी स्टुडिओजची निर्मिती असलेला 'पांडू' येत्या ३ डिसेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विजू माने यानं केलं आहे. भाऊ कदम भूमिकेबद्दल म्हणाला, 'सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाचे दोन क्षण देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं दुसरं पुण्य नाही. 'पांडू' हा सिनेमा प्रेक्षकांची ही गरज १०० टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंबरोबर काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिला आहे आणि कुशलची सोबत असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे.' तसंच दुसरीकडे तुफान एनर्जीची देणगी लाभलेला आणि कोणतंही पात्र लीलया साकारणारा कुशल म्हणाला, 'मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हाही चित्रपट कायम ठेवेल यात शंकाच नाही. गेल्या २१ वर्षांत आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेलीय आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्तानं प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. अशात 'पांडू'सारखा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे.' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EtqKR6