Full Width(True/False)

'आर्यन खान हा तर चांगला मुलगा', सुझेन खानची पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूड स्टार त्याचा मुलगा आर्यन खानमुळे जास्त चिंतेत आहे. अशावेळी जवळपास संपूर्ण बॉलिवूडच त्याच्यासोबत उभे असल्याचे दिसून येत आहे. आर्यन व त्याच्या काही मित्रांना क्रूझमधील रेव्ह पार्टीतून एनसीबीने शनिवारी अटक केली होती. त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबतच अर्पिता, अलवीरा, महीप कपूर सारखे अनेक कलाकार शाहरुख खानच्या घरी दिसून आले तर चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्ती शाहरुखला पाठिंबा देताना दिसत आहेत. यामधलं एक नाव म्हणजे ऋतिक रोशनची पूर्वाश्रमिची पत्नी सुझेन खान हिचे. याशिवाय दिग्दर्शक- निर्माते हंसल मेहता यांनीही शाहरुखला पाठींबा दर्शवणारे ट्वीट केले होते. सुझेन खानने आर्यन खानची प्रशंसा करत त्याला चांगला मुलगा म्हटले आहे. सुझेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले. सुझेनने एका पत्रकाराच्या पोस्टवर आपलं मत नोंदवलं. ज्यात ही घटना पालकांसाठी वेकअप कॉल असल्याचं ती म्हणाली. आपल्या या ट्वीटमध्ये तिने शाहरुख आणि गाैरी यांना पाठींबा देताना लिहिले की, 'माझ्यामते हे विषयी नाहीये, कारण तो दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. या स्थितीला एक उदाहरण म्हणून पाहता येईल की, कसे बॉलिवूडमधील कलाकारांना लक्ष्य केले जाते. हे अतिशय दुःखद आणि चुकीचे आहे. कारण तो एक चांगला मुलगा आहे. मी शाहरुख आणि गाैरी यांच्यासोबत आहे.' या अगोदर हंसल मेहता आणि अभिनेत्री नफीसा अली यांनीही आर्यन विषयी आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले होते. नफीसा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर म्हटले की, 'आर्यनसाठी मी प्रार्थना करत आहे. त्याला मदतीची गरज आहे. त्याचे खच्चीकरण करु नका, त्याला तोडून नका. त्याच्याकडे उदाहण म्हणून पाहू नका.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DfzxFQ