Full Width(True/False)

Google ने बॅन केले 'हे' ३ Apps, तुमच्या फोनमध्ये असतील तर Delete करा, अन्यथा अकाउंट रिकामेच समजा

नवी दिल्ली: ने नुकतेच १५० अॅप्सवर घातक म्हणून बंदी असून आता आणखी तीन अॅप्सवर Google ने बंदी घातली आहे, ज्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. कंपनीने खुलासा केला होता की, हे अॅप्स काढून टाकल्यास युजर्ना फायदा होईल. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील हे अॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा, कारण हे Apps तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात. पाहा डिटेल्स. वाचा: Google PlayStore वर बंदी घालण्यात आलेले हे अॅप्स युजर्सची वैयक्तिक माहिती आणि पैसे चोरत होते . सिक्युरिटी फर्म कॅस्परस्कीने हे अॅप्स शोधले आणि सांगितले की युजर्सची वैयक्तिक माहिती फेसबुक लॉगिनद्वारे चोरली जात असून बँक खात्यांमध्ये देखील प्रवेश केला जात आहे. बर्‍याच वेब सेवा आणि अॅप्सवरील 'लॉगिन विथ फेसबुक' बटण युजर्सना पटकन प्रमाणीकृत करण्यासाठी आणि दुसरे युजरनेम आणि संकेतशब्द तयार केल्याशिवाय सेवेमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यासाठी वापरल्या जातात. स्पॉटिफाई आणि टिंडर सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मद्वारे देखील यांचा वापर केला जातो. सिक्युरिटी फर्मच्या मते, हे अॅप्स लॉग इन क्रेडेन्शियल चोरण्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश करण्यासाठी साइन-इन डेटा वापरत होते. Google ने या तीन अॅप्सवर बंदी घातली : "मॅजिक फोटो लॅब - फोटो एडिटर", "ब्लेंडर फोटो एडिटर - इझी फोटो बॅकग्राउंड एडिटर" आणि "पिक्स फोटो मोशन एडिट 2021" अशी बंदी घातलेल्या अॅप्सची नावे आहेत. या अॅप्सवर प्ले स्टोअरमधून बंदी घालण्यात आली आहे. या अॅप्सपासून सुरक्षित कसे राहावे ज्या युजर्सनी हे अॅप्स डाउनलोड केले आहेत त्यांना ते त्यांच्या फोनवरून Manually काढावे लागतील आणि त्यांचे Facebook लॉगिन तपशील देखील बदलावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DD48gC