Full Width(True/False)

लवकरच लाँच होणार TECNO Spark 8P स्मार्टफोन, आकर्षक लूकसह मिळेल भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली : तुम्ही जर कमी बजेटमध्ये शानदार फीचर्ससह येणारा शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. टेक्नोचा हा फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता असून, कंपनीने याबाबत घोषणा केली आहे. फोनमध्ये ६.६ इंच डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. वाचाः TECNO Spark 8P: किंमत आणि स्पेसिफिकेशन Spark 8P च्या किंमतीचा अधिकृतपणे खुलासा होणे बाकी आहे. हा फोन फिरोजा सियान, आयरिस पर्पल, अटलँटा ब्लू आणि कोको गोल्ड रंगात येईल. फोनमध्ये फुल एचडी+ रिझॉल्यूशन ६.६ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ व रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल आणि रियरला ५० मेगापिक्सल AI कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. यात मीडियाटेक हीलियो जी७० चिपसेटसह ४ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. ४जी कनेक्टिव्हिटीसह ड्यूल नॅनो-सिम सपोर्ट दिला जाईल. यात १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोन अँड्राइड ११ आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. दरम्यान, TECNO ने काही दिवसांपूर्वीच TECNO Camon 18 सीरिजला लाँच केले आहे. यात ६.८ इंच पंच-होल डिस्प्ले दिला आहे. फास्ट चार्जिगं सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. Camon 18 मीडियाटेक हीलियो G८८ चिपसेट आणि Camon 18P हीलियो G९६ चिपसेट सपोर्टसह येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j1Ka7h