Full Width(True/False)

जाणून घ्या Metaverse नक्की काय आहे, ज्यासाठी फेसबुकने बदलले नाव

नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी ने आपले नाव बदलत ठेवले आहे. याबाबतची चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरू होती. कंपनीला आता केवळ सोशल मीडियापर्यंतच मर्यादित राहायचे नाही. फेसबुकने नवीन टेक्नोलॉजी साठी स्वतःला रिब्रँड केले आहे. वाचाः यासाठी फेसबुकने घोषणा केली होती की ऑगमेंटेड आणि व्हर्च्यूअल रियालिटीसाठी वेगळे फायनेंशिय रिझल्ट पब्लिश करेल. याद्वारे Metaverse प्रोजेक्टसाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. फेसबुकचा जाहिरात व्यवसाय कमी होत असल्याचे कारण यामागे सांगितले जात आहे. टेक्नोलॉजी आणि व्यवसायामध्ये कॉन्सेप्ट वेगाने लोकप्रिय होत आहे. Metaverse हे एनवायरमेंट असून, याला लोक इंटरनेटद्वारे अ‍ॅक्सेस करू शकतील. अनेकजण Metaverse शब्दाचा वापर गेमिंग वर्ल्डसाठी देखील करतात. यात यूजरकडे एक पात्र असते, जे चालू शकते व दुसऱ्या प्लेअर्ससोबत रियल वर्ल्डप्रमाणेच संवाद साधते. याशिवाय ब्लॉकचेन टेक्नोलॉजीसाठी Metaverse वापरले जाते. यात यूजर्स व्हर्च्यूअल लँड व इतर डिजिटल अ‍ॅसेट्सद्वारे क्रिप्टोकरेंसी खरेदी करू शकतात. अनेक सायन्स-फिक्शन चित्रपट आणि पुस्तके देखील Metaverse वर आधारित आहे. सध्या बहुतांश व्हर्च्यूअल स्पेस रियल लाइफऐवजी व्हिडिओ गेमप्रमाणे वाटते. मात्र, यानंतर यामुळे आभासी जगात देखील खऱ्या जगाचा भास होईल. Metaverse ला इंटरनेट डेव्हलपमेंटचा पुढील टप्पा मानले जात आहे. सध्या लोक एकमेकांशी ऑनलाइन इंटरएक्शन वेबसाइट जसे सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करतात. Metaverse मुळे एक नवीन ऑनलाइन स्पेस तयार होईल. याद्वारे लोक खऱ्या जगाप्रमाणेच एकमेकांशी संवाद साधू शकतील. याद्वारे तुम्ही एका आभासी जगात जाऊ शकता. येथे मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी बोलू शकता, त्यांच्यासोबत फिरू शकता. शॉपिंग करता येईल, घर-गाडी खरेदी करून खऱ्या जगाप्रमाणेच वापरू शकता. कोरोनामुळे लोक घरून काम करत आहेत. अशात रियल वर्ल्डप्रमाणे इंटरएक्शनची मागणी वाढली आहे. Metaverse द्वारे कंपनी गुंतवणूकदार व इतर कंपन्यांना सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट अस्तित्वात येणाऱ्यासाठी मात्र अनेक वर्ष लागू शकतात. वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nBZY2d