नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी Tecno ने आपले दोन लेटेस्ट स्मार्टफोन आणि 18P लाँच केले आहेत. विशेष म्हणजे, नवीन Tecno मोबाईल फोन तीन बॅक कॅमेरे आणि होल-पंच डिस्प्लेसह लाँच करण्यात आले आहेत. फरकाबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही फोनचे रिफ्रेश रेट वेगळे आहेत, Tecno Camon 18 फोन ९० Hz रिफ्रेश रेट आणि Tecno Camon 18P १२० Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह येतो. पाहा डिटेल्स. वाचा: Tecno Camon 18: वैशिष्ट्ये डिस्प्ले: फोनमध्ये ६.८ इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. ज्याचा, रिफ्रेश रेट ९० Hz आणि आस्पेक्ट रेशो २० : ५: ९ आहे. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G 88 प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी देण्यात आले आहे. कॅमेरा: फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर यात देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, ए-जीपीएस, एफएम रेडिओ आणि यूएसबी पोर्टचा समावेश आहे बॅटरी: ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी, १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Tecno Camon 18P : वैशिष्ट्ये डिस्प्ले: फोनमध्ये ६.८ इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे जो १२० Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि २०: ५ :९ आस्पेक्ट रेशियोसह आहे. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G 96 प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी आहे. कॅमेरा: फोनच्या मागील पॅनलवर तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. बॅटरी: ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Tecno Camon 18 किंमत: Tecno Camon 18 आणि Tecno Camon 18P चे Dusk Grey, Ceramic White आणि Iris Purple असे तीन रंग प्रकार आहेत. सध्या Tecno Camon 18 आणि Tecno Camon 18P च्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YoWMOA