Full Width(True/False)

Nokia चा बहुचर्चित पहिला टॅबलेट अखेर लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली : स्मार्टफोनमुळे गेल्या काही वर्षात टॅबलेटची मागणी कमी झाली होती. मात्र, आता वर्क फ्रोम होम आणि ऑनलाइन क्लासेसमुळे पुन्हा एकदा टॅबलेटची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपन्या नवनवीन टॅबलेट्स बाजारात आणत आहेत. काही दिवसांपूर्वी रियलमीने भारतात आपला पहिला लाँच केला होता. आता एचएमडी ग्लोबलने आपला पहिला टॅबलेट ला सादर केले आहे. वाचा: T20 हा बजेट सेगमेंटमध्ये येणारा टॅबलेट आहे व यात अँड्राइड सपोर्ट दिला आहे. कंपनीने या डिव्हाइसला रग्ड कव्हर आणि रग्ड कव्हर विद स्टँडसह लाँच केले आहे. Nokia T20 टॅबलेटची किंमत १७९.९९ GBP (जवळपास १८,३१२ रुपये) आहे. ही किंमत वाय-फाय मॉडेलची आहे. तर एलटीई व्हेरिएंटची किमंत १९९.९९ GBP (जवळपास २०,३५० रुपये) आहे. नोकियाच्या या टॅबलेटला निळ्या रंगात सादर केले आहे. नोकियाचा हा टॅबलेट भारतात कधी लाँच होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Nokia T20 टॅबलेटच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात १०.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. टॅबलेट Unisc T६१० चिपसेटसह येतो. यात ३ जीबी/४ जीबी रॅम आणि ३२ जीबी/६४ जीबी स्टोरेज सपोर्ट मिळतो. टॅबलेटमध्ये फ्रंटला ५ मेगापिक्सल आणि रियरला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. टॅबलेट पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. पॉवरसाठी यात ८२०० एमएएचची बॅटरी दिली असून, सिंगल चार्जमध्ये १५ तास वेब सर्फिंग करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iEbh8p