Full Width(True/False)

जबरदस्त ग्राफिक्ससह Acer Nitro 5 Laptop लाँच, गेमर्ससाठी एकापेक्षा एक फीचर, पाहा किंमत

नवी दिल्ली: Acer ने Nitro 5 सीरीज अंतर्गत एक नवीन गेमिंग लॅपटॉप युजर्ससाठी लाँच केला असून नवीन Acer Nitro 5 १७.३ -इंच, १०८० डिस्प्ले, १४४ Hz डिस्प्ले रिफ्रेश रेटसह येतो आणि इंटेल कोर i7 11 व्या जनरल प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. नवीन मॉडेलसाठी ग्राफिक्स चिप एनव्हीडियाची आरटीएक्स ३०५० टीआय आहे, जास्तीत जास्त ग्राफिक्स पॉवर आणि सीपीयू मॉडेल अद्याप स्पेसिफाय करण्यात आले नाही. वाचा: Acer ने Nitro 5 मध्ये काय विशेष ? नवीन मॉडेलमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या Nitro 5 मधून काही बदल झाले आहेत, तरीही त्याच्या काठावर लाल आणि काळ्या रंगाचे डिझाइन कायम आहे. त्यात एक पूर्ण आकाराचा कीबोर्ड असून बॅरल प्लग चार्जर आता लॅपटॉपच्या मागील बाजूला जोडता येतो. Acer Nitro 5 : किंमत आणि वैशिष्ट्ये : Acer Nitro 5 गेमिंग लॅपटॉपची किंमत $ १,१९९.९९ (८९,७९२ रुपये) असेल. यात १६ जीबी रॅम आणि १ टीबी इंटर्नल आहे. १७.३ इंच Nitro 5 गेमिंग लॅपटॉपमध्ये इथरनेट पोर्ट, थंडरबोल्ट ४ पोर्ट, तीन यूएसबी-ए पोर्ट, एचडीएमआय, ३. ५ मिमी हेडफोन जॅक आणि केन्सिंग्टन स्लॉट आहे. छोटे मॉडेल या महिन्यात लाँच केले जाईल : नवीन Acer Nitro 5 गेमिंग लॅपटॉप ऑक्टोबरच्या मध्यावर उपलब्ध होईल आणि त्याची प्रभावी वैशिष्ट्ये लक्षात घेता, गेमर्सवर त्याचा मोठा प्रभाव पडेल अशी अपेक्षा आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर एक लहान मॉडेल देखील रिलीज होणार आहे. छोट्या मॉडेलची किंमत $ ७६९. ९९ (५७,६१६ रुपये) आहे आणि १४. ६ Hz डिस्प्ले रिफ्रेश रेटसह १५.६ इंच स्क्रीन आहे. हे ११ व्या पिढीचे इंटेल कोर i5 प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी, एनव्हीडिया ग्राफिक्स जीटीएक्स १६५० चिपसह समर्थित आहे. मॉडेलमध्ये १७. ३ इंच Nitro 5 सारखीच पोर्ट आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oJeasi