Full Width(True/False)

भारतात लाँच आधीच OnePlus 9RT ची किंमत लीक, दिवाळी आधी होऊ शकतो फोन लाँच,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता OnePlus लवकरच आपला नवा OnePlus मोबाईल फोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे, पण लाँच होण्याआधीच किंमतीबद्दल काही संकेत मिळाले असून अशी माहिती समोर आली आहे की, भारतात ची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. वाचा: OnePlus 9RT हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन असून गेल्या आठवड्यातच चीनी बाजारात लाँच झाला आहे आणि असे मानले जाते की हे कंपनीच्या OnePlus 9R चे अपग्रेड व्हर्जन आहे. पाहा डिटेल्स. OnePlus 9RT किंमत : या नवीन वनप्लस मोबाईल फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत चीनी बाजारात सीएनवाय ३२९९ (सुमारे ३८,५०० रुपये) आहे. भारतीय बाजारपेठेत या हँडसेटची किंमत चीनच्या बाजारपेठेत सुरू झालेल्या किंमतीपेक्षा जास्त असू शकते, असे नवीन संकेत मिळाले आहेत. भारतातील OnePlus 9RT च्या किंमतीबद्दल, टीपस्टर योगेश बरार यांनी सूचित केले आहे की, या हँडसेटची किंमत भारतात ४० हजार ते ४४ हजारांच्या दरम्यान असू शकते. एवढेच नाही तर ट्वीटमध्ये असेही नमूद केले आहे की, टिपस्टरला अशी अपेक्षा आहे की हे मॉडेल OnePlus 8T म्हणजेच ४२,९९९ रुपयांच्या किंमतीत भारतात आणले जाऊ शकते. सध्या हा फोन भारतात कधी लाँच केला जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, OnePlus 9RT ऑगस्टमध्ये बीआयएस साइटवर स्पॉट झाला असून टिपस्टरला अपेक्षा आहे की OnePlus 9 RT दिवाळी २०२१ पूर्वी भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. OnePlus 9RT वैशिष्ट्ये : या वनप्लस स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो. फोनमध्ये ६.६२ इंच E4 OLED डिस्प्ले आहे जो १२० Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. याशिवाय, फोनला १३०० nits पीक ब्राइटनेस, ६०० Hz टच रिस्पॉन्स आणि HDR 10 प्लस सपोर्ट मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरे दिले जाऊ शकतात, ५० मेगापिक्सलचा सोनी IMX766 प्रायमरी कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरा सेन्सर. सेल्फीसाठी फोनच्या समोर १६ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देखील यात दिला जाऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vq6Ym6