Full Width(True/False)

सर्विस सेंटरला मोबाइल देताना 'या' चुका करू नका, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल

नवी दिल्ली : प्रत्येकजण खरेदी करताना लवकर खराब होणार नाही, असा हँडसेट घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, फोनमध्ये कोणतीना कोणती समस्यe येतेच. कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किती दिवस टिकेल, यावर विश्वास ठेवता येणार नाही. अनेकदा फोनमध्ये कोणती मोठी समस्या आल्यावर आपण सर्व्हिंस सेंटरमध्ये जातो. मात्र, सर्व्हिस सेंटरमध्ये फोन घेऊन जाण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. वाचा: तुम्ही मोबाइल दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस सेंटरला जात असाल तर अधिकृत सर्व्हिंस सेंटरलाच जा. सध्या अनेक बनावट हे अधिकृत असल्याचा दावा करतात. यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरील नंबरवर कॉल करून अधिकृत सर्व्हिस सेंटरची माहिती घेऊ शकता. सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाइल जमा करण्याआधी त्यातील फोटो, व्हिडिओ, नंबर व अन्य महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या. , हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, याचा बॅकअपसाठी वापर करू शकता. सर्व्हिस सेंटरमध्ये तुमचा खासगी डेटा सार्वजनिक होण्याचा, तसेच डिलीट होण्याचा धोका असतो. अनेकजण सर्व्हिस सेंटरमध्ये घाईघाईत स्मार्टफोन देण्याच्या नादात सिम कार्ड, मेमरी कार्ड आणि बॅटरी तेथेच विसरतात. सध्या फोनमध्ये नॉन रिमूव्हेबल बॅटरी येते, जी काढू शकत नाही. मात्र, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून स्वतः जवळ ठेवावे. तुम्ही जर सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाइल देत असाल तर ओरिजिनल बिल घ्या. अनेकदा सर्व्हिस सेंटर्स सॉफ्टवेअर अपडेटपासून ते पार्ट्स बदलण्याचे देखील पैसे घेतात. त्यामुळे मोबाइलमध्ये काय समस्या आहे, याची माहिती घ्या व पार्ट्स बदलण्यासाठी ओरिजिनल बिल घ्यावे. अनेकदा आपल्याला सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यावर फोनमध्ये काय काय समस्या आहे हे पूर्णपणे सांगता येत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही याची एक यादी तयार करू शकता व सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यावर व्यवस्थितपणे त्याबाबत सांगता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FXDhxL