नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी ११ ऑक्टोबरला एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये आधारित चे ग्लोबल व्हर्जन लाँच करणार आहे. गुगलचे नेक्स्ट जनरेशन अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम लवकरच लाँच होणार आहे. अँड्राइड १२ च्या अधिकृत लाँचिंगआधी गुगलने अँड्राइड ओपन सोर्स प्रोजेक्टसाठी अँड्राइड १२ च्या ओएस सोर्स कोडला रोल आउट करणे सुरू केले आहे. वाचाः पुढील काही आठवड्यात अँड्राइड १२ ला स्मार्टफोनसाठी रोल आउट करणार आहे. यानंतर वर्षभरात Samsung, OnePlus, Oppo, Realme, Tecno, Vivo आणि Xiaomi चे स्मार्टफोन देखील नवीन ओएससह लाँच होतील. आता ओप्पोने कलरओएस १२ च्या लाँच तारखेची घोषणा केली आहे. ११ ऑक्टोबरला एका इव्हेंटमध्ये कलरओएस १२ ग्लोबल व्हर्जनला लाँच करणार आहे. याशिवाय इव्हेंटमध्ये ColorOS 12 चा परफॉर्मेंस आणि यावर आधारित स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली जाईल. ओप्पोच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर ColorOS १२ चा लाँच इव्हेंट लाइव्ह पाहता येईल. कंपनीने २०१९ मध्ये लाँच झालेल्या फोन्ससाठी देखील अपडेट पॉलिसीची घोषणा केली आहे. या अंतर्गत Oppo च्या Find X सीरिज स्मार्टफोनसाठी तीन अँड्राइड अपडेट Reno आणि F सीरिजसाठी दोनदा अँड्राइड अपडेट आणि ए सीरिजमध्ये काही स्मार्टफोनसाठी एकदा अँड्राइड अपडेटची गॅरेंटी देईल. याशिवाय कंपनी Find X सीरिज स्मार्टफोन, रेनो आणि एफ सीरिज स्मार्टफोनसाठी चार वर्ष रेग्यूलर सिक्योरिटी पॅच आणि ए सीरिजसाठी तीन वर्ष सिक्योरिटी पॅच उपलब्ध करेल. Oppo ने याआधी मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये अँड्राइड १२ साठी कलरओएस १२ आधारित स्मार्टफोन Oppo Find X3 Pro ला लाँच केले आहे. ओप्पो अँड्राइड १२ रिलीज करणारी पहिली ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर कंपनी बनली आहे. ओप्पोने म्हटले आहे की, कलरओएस १२ मध्ये जगभरातील ११० पेक्षा अधिक डिव्हाइस आणि १५० मिलियनपेक्षा अधिक ओप्पो स्मार्टफोन यूजर्सला अपडेट मिळेल. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कलरओएस अपडेट असेल. वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Djgf22