Full Width(True/False)

ट्रिपल कूलिंग सिस्टमसह सुसज्ज Whirlpool W series 4-door Refrigerator भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्ली: Whirlpool इंडियाने प्रीमियम ४ डोअर रेफ्रिजरेटर्सची W-Series श्रेणी लाँच केली असून त्याची किंमत १,६७,६०० रुपये आहे. यात ६६५ लिटर स्टोरेज स्पेस आणि क्वाट्रो (४ दरवाजा) स्वरूप आहे, जे ग्राहकांना पुरेशी जागा देते. 4-Door Refrigerator अॅडॅप्टिव्ह इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आणि ट्रिपल कूलिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जे थंड आणि दीर्घकाळ टिकणारे ताजेपणा सुनिश्चित करते. जाणून घेऊया व्हर्लपूल डब्ल्यू-सीरीज रेफ्रिजरेटर बद्दल सविस्तर. वाचा: Whirlpool w-series 4-door Refrigerator ची वैशिष्ट्ये :रेफ्रिजरेटरच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, त्यात पुल-आउट शेल्फ, सुलभ प्रवेश ट्रे आणि भाज्यांसाठी डबल क्रिस्पर आहे. यात ६ इन १ कन्व्हर्टिबल मोड, बर्फ आणि वॉटर डिस्पेंसरसह डोअर-इन-डोर सुविधा, जबरदस्त डिस्प्ले, मेटॅलिक इंटीरियर आणि स्पेशल लाइटनिंग सिस्टम मिळते. व्हर्लपूलच्या डब्ल्यू सीरिजला २०२१ चा 'आयएफ डिझाईन अवॉर्ड' मिळाला आहे. ट्रिपल कूलिंग सिस्टम : तीन स्वतंत्र कूलिंग सिस्टम गंध मिसळण्यापासून रोखण्यासाठी आणि अन्न जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी तीन कंपार्टमेंट्स (फ्रीज, फ्रीजर आणि कन्व्हर्टिबल स्पेस) मध्ये अन्न अधिक ताजे ठेवतात. गोठविण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी एक स्मार्ट बटण आहे. ज्यामुळे अन्न अधिक जलद गोठवता येईल. दररोज १.५ किलो बर्फाचे तुकडे किंवा क्रस्ड बर्फ Fridge तयार करू शकतो. इन-डोअर आइस मेकर स्पेस सेव्हर आहे. डिझाइन कॉम्पॅक्ट आहे आणि फ्रीजमध्ये उपलब्ध जागा वाढवण्याची परवानगी देते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iB7UiF