नवी दिल्लीः Oppo सध्या आपल्या के सीरीजचा एक नवीन स्मार्टफोन K9s लाँच करण्याची तयारी करीत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या सर्टिफिकेशन वेबसाइट 3C आणि वर ओप्पोचा एक नवीन हँडसेट पाहायला मिळाला होता. याचे मॉडल नंबर PERM10 होते. लेटेस्ट रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, हा हँडसेट मॉनिकर सोबत मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो. चायनीज टिप्स्टर Why Lab ने या अपकमिंग स्मार्टफोनच्या पोस्टर्सला शेयर केले आहे. शेयर करण्यात आलेल्या पोस्टरनुसार, हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आणि जबरदस्त 4G इन-गेम वाइब्रेशनसाठी चक्क X-axis लीनियर मोटर सोबत येईल. फोनला कंपनी तीन कलर व्हेरियंट ब्लॅक, सिल्वर, आणि पर्पल मध्ये लाँच करू शकते. मिळू शकतात हे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये कंपनी 1080x2412 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५९ इंचाचा फुल एचडी प्लस LTPS डिस्प्ले ऑफर करू शकते. हा फोन ८ जीबी आमि १२ जीबी रॅम सोबत १२८ जीबी आणि २५६ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येते. फोनची मेमरीला वाढवण्यासाठी कंपनी यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट सुद्धा देवू शकते. प्रोसेसर म्हणून यात स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ऑफर करू शकते. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सल मिळण्याची शक्यता आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात कंपनी 4,880 mAh ची बॅटरी देवू शकते. 3C सर्टिफिकेशनच्या माहितीनुसार, ही बॅटरी ३० वॉटची रॅपिड चार्जिंग सपोर्ट करणार आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये प्री-इंस्टॉल्ड अँड्रॉयड ११ ओएस मिळण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aA04Bc