Full Width(True/False)

मजेशीर ट्रिक! पेड अ‍ॅप्ससाठी द्यावे लागणार नाही पैसे, मोफत असे करा डाउनलोड

नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये अनेक वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात. मात्र, हे अ‍ॅप्स योग्य प्लॅटफॉर्मवरुन डाउनलोड करून तुम्ही मोफत वापरू शकता. वर तीन अब्ज अ‍ॅक्टिव्ह डिव्हाइस आणि ३० लाखांपेक्षा अधिक अ‍ॅप्स आहेत. प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्यांना डाउनलोड करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. यातील बहुतांश अ‍ॅपमध्ये जाहिराती असतात. मात्र, तुम्ही प्ले स्टोरवरून पेड अ‍ॅप मोफत डाउनलोड करू शकतात. हे कसे करता येईल याबाबत जाणून घेऊया. वाचाः अनेक अ‍ॅप्स प्रीमियम अ‍ॅप्सप्रमाणेच सर्व कंटेंट मोफत दाखवतात. अनेक यूजर्स अशा अ‍ॅप्सला इतर प्लॅटफॉर्मवरून डाउनलोडकरुन फोनमध्ये मोफत इंस्टॉल करतात. मात्र, असे अ‍ॅप्स आयफोनमध्ये काम करत नाही. कारण आयओएसमध्ये केवळ अ‍ॅप स्टोरवरुनच अ‍ॅप डाउनलोड करता येतात. इतर साइट्सवर अ‍ॅप्स डाउनलोड करता येत नाही. परंतु, अँड्राइड डेव्हलपरसाठी पायरेटेड म्हणजेच कॉपी अ‍ॅप्स मोठी समस्या ठरते. या प्रकारच्या अ‍ॅप्समध्ये वायरस आणि मॅलवेअरचा समावेश असतो. डेटा चोरी होण्याचे देखील हे कारण ठरते. मोफत उपलब्ध असतात अ‍ॅप्स प्ले स्टोरवरीव प्रीमियम अ‍ॅप्ससाठी पैसे द्यावे लागतात. मात्र, यामुळे त्या अ‍ॅपचे पायरटेड व्हर्जन डाउनलोड करण्याची गरज नाही. गुगल प्ले स्टोरवर अँड्राइड डेव्हलपर्स अनेक फ्री अ‍ॅप व्हर्जन लाँच करत असतात. हे अ‍ॅप्स प्रमोशन दरम्यान काही दिवसांसाठी मोफत उपलब्ध असतात. प्ले स्टोरवर काही अ‍ॅप्स डिस्काउंटसह देखील उपलब्ध असतात. कोणत्या अ‍ॅप्सवर कधी किती डिस्काउंट मिळेल याची देखील माहिती मिळते. अशा अ‍ॅप्सला तुम्हाला मोफत डाउनलोड करता येईल. गूगल प्ले स्टोरवर अँड्राइड अ‍ॅप्स कसे शोधाल? तुम्ही कॅटेगरीनुसार अ‍ॅप्स शोधू शकता. तुम्ही प्रमोशन आणि डिस्काउंटवर मिळणारे अ‍ॅप्स डाउनलोड करुन आनंद घेऊ शकता. याशिवाय कीवर्ड्स, फिल्टर आणि इतर पर्यायांचा वापर करुन प्ले स्टोरवर चांगले अ‍ॅप्स शोधता येईल. या अ‍ॅप्सची घ्या मदत AppsFree, AppSales, Paid Gone Free, FreeAppsNow सारख्या अ‍ॅप्समुळे कोणतेही नवीन फ्री अ‍ॅप अथवा गेम लाँच झाल्यास तुम्हाला त्वरित नॉटिफिकेशन येईल. या अ‍ॅप आणि गेम्सचा तुमच्या लायब्ररीमध्ये समावेश होतो. म्हणजेच तुम्ही प्रमोशन संपल्यानंतर देखील इतर डिव्हाइसमध्ये या अ‍ॅप्सला गुगल प्ले स्टोरवरुन मोफत डाउनलोड करू शकता. वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FJVoY3