Full Width(True/False)

दमदार फीचर्ससह बहुचर्चित Redmi Note 11 सीरिज अखेर लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : चीनी कंपनी Xiaomi ने सीरिजला लाँच केले आहे. या अंतर्गत Note 11, आणि स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. वाचा: Redmi Note 11 मध्ये ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एलसीडी पॅनल असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ८१० ५जी चा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनला फुल चार्ज होण्यासाठी ६२ मिनिटे लागतात. यात रियरला ५० मेगापिक्सल प्रायमरी लेंस आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस दिली आहे. सेल्फीसाठी पंचहोल असून, यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात हेडफोन जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. Redmi Note 11 Pro Redmi Note 11 Pro मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९२० चिपसेटचा सपोर्ट मिळतो. यात ६.६७ इंच फुल एचडी प्लस ओलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. Redmi Note 11 Pro मध्ये १०८ मेगापिक्सल प्रायमरी लेंस, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस, २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ६७ वॉट फास्ट चार्जिंगसह ५,१६० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन चार्ज होण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे लागतात. Redmi Note 11 Pro Plus या फोनमध्ये मीडियाटेक ९२० चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. यात १२० हर्ट्जसह येणारी ओलेड स्क्रीन दिली आहे. फोन तीन रियर कॅमेऱ्यासह येतो. यात १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,५०० एमएएचची बॅटरी दिली असून, फोन अर्ध्या तासात फुल चार्ज होतो. Redmi Note 11ची सुरुवाती किंमत १,१९९ युआन, तर टॉप मॉडेलची किंमत १,६९९ युआन आहे. Redmi Note 11 Pro Plus ची किंमत १,९९९ युआनपासून सुरू होते. हे स्मार्टफोन्स भारतात कधी लाँच होतील, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CxulgE