नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता विवो आणि रिलायन्स जिओ ने बुधवारी स्मार्टफोनच्या ग्राहकांना इंस्टेंट कॅशबॅक आणि अन्य ऑफर देण्यासाठी ऑफर आणली आहे. या कॉलेबोरेशन एक्सटेंड अंतर्गत जिओ कनेक्शनच्या Vivo Y21 ग्राहकांना १ हजार रुपयाचे इंस्टेंट कॅशबॅक आणि ७ ऑक्टोबर पासून रिलायन्स रिटेलकडून देण्यात येणारे अतिरिक्त बेनिफिट्स मिळेल. फ्लिपकार्ट आणि विवोच्या अधिकृत साइट दोन्ही जागी Vivo Y21 ची सुरुवातीची किंमत १३ हजार ९९० रुपये आहे. थेट खात्यात पोहोचणार कॅशबॅक ७ ऑक्टोबर पासून Vivo Y21 ग्राहकांना १५ दिवसाच्या आत अॅप वरून JioExclusive चा लाभ मिळू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहक MyJio वर JioExclusive सेक्शन मध्ये जावून तसेच UPI हँडलला शेयर करून थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये कॅशबॅक मिळवू शकतात. विवो इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर निपूण मार्या यांनी सांगितले की, आता आम्ही ग्राहकांना खरेदी वर १५ दिवसाच्या आत JioExclusive Program इनरोल करण्याचा पर्याय देत आहोत. प्रोग्रामला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. आम्ही भविष्यात जास्त जिओ एक्सक्लूसिव्ह विवो फोन लाँच करण्याची योजना बनवत आहोत. ईटी टेलीकॉम ने आपल्या मागील रिपोर्ट मध्ये सांगितले होते की, रिलायन्स इंडस्ट्रीज Jio-SIM locked किंवा JioExclusive हँडसेट आणण्यासाठी ऑफलाइन स्टोर्स सोबत टाय अप करण्याची योजना बनवत आहे. हा जिओ सिम लॉक फोनसाठी विवो, शाओमी, सॅमसंग, ओप्पो, एचएमडी ग्लोबल आणि आयटेल सह कंपनी सोबत रिव्हर्स हँडसेट बंडलिंग पार्टनरशीपवर स्वाक्षरी करीत आहे. Vivo Y21 चे फीचर्स Vivo Y21 च्या फोनमध्ये ६.५१ इंचाचा एचडी प्लस हेलो फुल व्ह्यू डिस्प्ले सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग क्षमता सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हे मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर दिले आहे. फोन 128GB ची मेमरी कॅपिसिटी आणि अँड्रॉयड ११ वर बेस्ड FunTouch OS 11.1 सोबत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP सुपर मायक्रो लेन्स सोबत AI रियर कॅमेरा सिस्टम दिले आहे. फ्रंट एआय ब्यूटिफिकेशन मोड सोबत 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oKxBBf