Full Width(True/False)

Vodafone Idea चे स्वस्तात मस्त शानदार प्रीपेड प्लान्स, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज मिळेल ४ जीबी डेटा

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी () कडे ग्राहकांसाठी अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहे. कंपनीच्या कमी किंमतीच्या प्लानमध्ये ग्राहकांना डेटा, कॉलिंगसह लाइव्ह टीव्ही, मूव्हीचे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, विकेंड डेटा रोलओव्हर आण बिंज ऑल नाइटची देखील सुविधा दिली जात आहे. कंपनीच्या अशाच ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या काही शानदार प्रीपेड प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Vi चा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान कंपनीच्या या प्लानमध्ये डबल डेटा ऑफर मिळत आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटासह अतिरिक्त २ जीबी डेटा मिळेल. म्हणजेच प्लानमध्ये दररोज ४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, विकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि लाइव्ह टीव्ही वीआय मूव्हीची सुविधा मिळेल. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. Vi चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस, दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय विकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि लाइव्ह टीव्ही-वीआय मूव्हीचे सबस्क्रिप्शन मिळते. Vi चा ३०१ रुपयांचा प्रीपेड प्लान २८ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय Hospicare कडून विमा दिला जात आहे. एवढेच नाही तर विकेंड डेटा रोलओव्हर, लाइव्ह टीव्ही आणि वीआय मूव्हीचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. Vi चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये डबलडेटा ऑफर मिळत आहे. दररोज २ जीबी डेटासह अतिरिक्त २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, लाइव्ह टीव्ही, वीआय मूव्ही, बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vXa5T5