नवी दिल्ली: अनेक युजर्स ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो, लाँच झाला असून त्याची किंमत ६, ४०० रुपये आहे. JioPhone Next मध्ये ५.४५ इंचाचा मल्टीटच डिस्प्ले दिला जाईल. स्क्रीन रिझोल्यूशन एचडी प्लस आहे. याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे संरक्षण देण्यात आले आहे आणि त्यासोबत अँटी फिंगरप्रिंट कोटिंग देखील आहे. चे सीईओ सुंदर पिचाई यांनीही जिओफोन नेक्स्ट लाँचवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये Google ब्लॉगची लिंक आहे जिथे JioPhone Next चे डिटेल्स आहेत. Reliance Jio ने JioPhone Next साठी गुगलसोबत करार केला आहे. वाचा: JioPhone Next मध्ये Qualcomm 215 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा क्वाड कोअर प्रोसेसर ज्याचा वेग १.३ GHz पर्यंत आहे. या स्मार्टफोनमध्ये २ GB रॅम मिळेल. JioPhone Next मध्ये ३२ GB चे इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रो एसडी कार्ड सपोर्टही देण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही मेमरी ५१२ GB पर्यंत वाढवू शकता. JioPhone Next मध्ये दोन सिम बसवता येतील. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये मायक्रो यूएसबी पोर्ट आणि हेडफोन जॅक आहे. ब्लूटूथ आणि वायफायची कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्सलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. फोनचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे, तर मागील कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. JioPhone Next ची बॅटरी ३,५०० mAh आहे. JioPhone Next मध्ये Google कॅमेरा F देण्यात आला आहे, जो HDR ला देखील सपोर्ट करतो. याशिवाय नाईट मोड आणि सॉफ्टवेअर बेस्ड पोर्ट्रेट मोडलाही सपोर्ट करण्यात आला आहे. JioPhone Next हा Android आधारित प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून या फोनची किंमत १,९९९ रुपये सांगितली जात आहे. जी त्याची इफेक्टिव प्राइस आहे. Phone खरेदी करण्यासाठी तुम्हाला ६, ४९९ रुपये मोजावे लागतील. फोनसह, तुम्हाला डेटा प्लान्स मिळतील, ज्यामुळे कंपनीतर्फे त्याची प्रभावी किंमत कमी सांगण्यात येत आहे. ग्राहकांना दिवाळीपासून फोन खरेदी करता येणार असून कंपनीने ईएमआयचा पर्यायही ठेवला आहे. जर तुम्ही फोन १,९९९ रुपये देऊन खरेदी केला , तर नंतर तुम्हाला दर महिन्याला EMI म्हणून पैसे द्यावे लागतील. तुम्ही १८ महिने किंवा २४ महिन्यांचा EMI सेट करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EoTri2