नवी दिल्ली : आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट जारी करत असते. कंपनीने यूजर्सचा कॉल एक्सपीरियन्स वाढवण्यासाठी कंपनीने ग्रुप व्हिडिओ सर्व्हिसमध्ये नवीन फीचर जोडले आहे. कंपनीने जॉइनेबल कॉल फीचरचा समावेश केला आहे. यामुळे यूजर्सला ग्रुप कॉलमध्ये थेट सहभागी होता येईल. वाचा: जॉइनेबल कॉल्सला पहिल्यांदा जुलै महिन्यात सादर करण्यात आले होते. लेटेस्ट अपडेटसह अनेक बदल केले आहेत. ग्रुप कॉल नॉटिफिकेशन आता पार्टिसिपेंटऐवजी ग्रुपचे नाव दर्शवेल. WhatsApp ने मध्ये काही बदल केले आहेत. एक यूजर आता ग्रुप चॅट विंडोद्वारे सुरू असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. सर्व ग्रुप व्हिडिओ आणि वॉइस कॉल चॅटमध्ये दिसेल. यामुळे अॅप उघडताच सहज पाहता येईल व त्यात सहभागी होऊ शकता. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही ग्रुपसह सहजरित्या जोडता येण्याची प्रक्रिया सोपी करत आहोत. कोणत्याही वेळी सहज चॅटद्वारे ग्रुप कॉलमध्ये सहभागी होता येईल. ग्रुप कॉल सुरू झाल्यानंतर यूजर कोणत्याही वेळी त्यात सहभागी होऊ शकतात. ग्रुप चॅटमध्ये Join Button नावाने एक टॅब दिसेल. कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी यावर क्लिक करावे लागेल. तसेच, कॉल नॉटिफिकेशनमध्ये यूजर्सच्या नावाऐवजी ग्रुपचे नाव दिसेल. लक्षात ठेवा की, जे लोकं संबंधित चा भाग आहे, तेच लोक ग्रुप कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, यासाठी एक वेगळी रिंगटोन देखील मिळेल. दरम्यान, WhatsApp ने गेल्या आठवड्यात नवीन यूजर्सला आकर्षित करणे आणि प्रायव्हसीच्या दृष्टीने नवीन फीचर जोडले आहे. कंपनीने आणि iCloud वर स्टोर करण्यात आलेल्या चॅटसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन रोलआउट करणे सुरू केले आहे. तसेच, कंपनी कथितरित्या वॉइस मेसेज फंक्शनला ग्लोबल वॉइस मेसेज प्लेअरसह अपग्रेड करत आहे. ग्रुप कॉलमध्ये असे होऊ शकता सहभागी तुम्ही जर ग्रुच्या वॉइस अथवा व्हिडिओ कॉलले इग्नोर केले असल्यास, नंतर तुम्हाला थेट ग्रुप चॅटद्वारे कॉलमध्ये सहभागी होण्याचा पर्याय दिसेल. यूजर्सला एक नॉटिफिकेशन दिसेल, ज्यात यूजर्सच्या नावाऐवजी ग्रुपचे नाव असेल. स्क्रीनवर जॉइन बटन असेल, त्यावर क्लिक करून सहभागी होता येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jpG6Ox