मुंबई : गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टीमधून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा याच्यासाठी बुधवारचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता. त्याच्या जामिना अर्जावर सेशन कोर्टामध्ये सुनावणी होणार होती. आता तरी आर्यनला जामीन मिळेल अशी त्याच्या कुटुंबियांची आणि शाहरुखच्या चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु त्याचा जामीन अर्ज न्यायालायने फेटाळून लावला. ही बातमी जेव्हा आर्यनला समजली तेव्हा त्याचा मोठा धक्का बसला आणि तो तणावग्रस्त झाला. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आर्यनला दिली बातमी आर्यन खानच्या जामीन अर्जावर १४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. परंतु त्या दिवशी न्यायमूर्तींनी हा निकाल राखून ठेवला. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. आता तरी आर्यनला जामीन दिला जाईल, अशी आशा त्याच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना होती. परंतु न्यायमूर्तींनी आर्यनसह अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा या तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. न्यायालायने हा निर्णय दिल्यानंतर नियमानुसार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आर्यनला त्याची माहिती दिली. बातमी ऐकल्यावर आर्यनची अशी होती प्रतिक्रिया आर्यनला जेव्हा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला ही बातमी सांगण्यात आली तेव्हा त्याला खूप धक्का बसला आणि तो अधिक दुःखी झाला. त्यानंतर तो कोठडीच्या एका कोपऱ्यात गपचूप जाऊन बसला. तो कुणाशीही बोलला नाही. मी निर्दोष असल्याचे त्याने इतरांना सांगितले होते बुधवारी होणाऱ्या जामीन अर्जाच्या सुनावणीमधून आर्यनला खूप अपेक्षा होत्या. आता तरी आपल्याला जामीन मिळेल अशी त्याला खात्री होती. परंतु जेव्हा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे त्याला समजले तेव्हा तो खूपच निराश झाला. त्याआधी आर्यनने तुरंगात असलेल्यांना निर्दोष असल्याचे अनेकदा सांगितले होते. इतर कैद्यांसोबत बॅरेकमध्ये आहे वास्तव्य एनसीबीच्या कोठडीनंतर आता आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या आर्यन मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. सुरुवातीला पाच दिवस त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला सर्वसाधारण कैद्यांसोबत बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. 'मन्नत'हून आली मनीऑर्डर आर्यनला सर्वसाधारण कैद्याप्रमाणेच वागणूक दिली जात आहे. त्याला कोणतीही विशेष सुविधा पुरवण्यात आलेली नाही. इतर कैद्यांना ज्याप्रमाणे जेवण, नाश्ता दिले जाते तोच त्यालाही दिला जात आहे.परंतु त्याला हे अन्न आवडत नसल्याने सुरुवातीला काही दिवस त्याने कँटिनमधून बिस्किटे आणि पाणी विकत घेऊन तेच खाऊन पोट भरले होते. त्यासाठी त्याला घरून ४ हजार ५०० रुपये मनीऑर्डर आली होती. काही दिवसांपूर्वी त्याने घरच्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला होता. या कारणांमुळे जामीन झाला रद्द आर्यनचा जामीन रद्द करताना न्यायालयाने कारणे दिली होती. न्यायालयाने सांगितले की, आर्यनला जर जामिनावर सोडले तर ते याप्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामध्ये व्हॉट्सअॅप चॅटचाही उल्लेख आहे. या चॅटमध्ये आर्यन नियमीतपणे ड्रग्ज घेत असल्याचा उल्लेख आहे. तसेच जामिनावर बाहेर आल्यानंतर आर्यन पुन्हा ड्रग्ज घेण्याची शक्यता आहे. भलेही आर्यनकडे ड्रग्ज मिळाले नाहीत परंतु आपल्या मित्राकडे ड्रग्ज आहे हे त्याला माहिती होते. उच्च न्यायालयात होणार सुनावणी दरम्यान, सेशन कोर्टामध्ये आर्यनच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीची कॉपी मिळाल्यानंतर त्याच्या वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्यात आल्याच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XDrx2c