नवी दिल्लीः Xiaomi चा नवीन स्मार्टफोन CIVI ला युजर्संकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने आयोजित केलेल्या पहिल्या सेलमध्ये फक्त ५ मिनिटात जवळपास २३० कोटी रुपयांच्या फोनची विक्री केली आहे. कंपनीने कंपनीने या फोनला फक्त चीनमध्ये लाँच केले आहे. या फोनला पहिल्या सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. कंपनीचे प्रोडक्ट मॅनेजरने सांगितले की, पहिला सेल जबरदस्त राहिला. अवघ्या ५ मिनिटात चीनमध्ये २०० मिलियन युआन जवळपास २३० कोटी रुपयांच्या फोनची विक्री झाली आहे. शाओमीचा हा फोन याच आठवड्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येतो. चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत २५९९ युआन म्हणजेच २९ हजार ८०० रुपये आहे. शाओमी CIVI चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस ओलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये कंपनी HDR 10+ सपोर्ट सोबत 20:9 चा आस्पेक्ट रेशियो आणि 120Hz चा रिफ्रेश रेट ऑफर करीत आहे. फोनमध्ये मिळणारा डिस्प्ले पंच होल डिझाइन, कर्व्ड एज आणि स्लिम बेजल्स दिले आहे. १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅश सोबत तीन रियर कॅमेरे मिळतील. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करीत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ५५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड MIUI 12.5 वर काम करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय फाय ६ई , ब्लूटूथ ५.२, जीपीएस, ५जी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A2Uxxf