Full Width(True/False)

गजबच! Xiaomi आणणार चक्क ड्रोन कॅमेरा फोन, हवेतून काढणार तुमचे फोटो

नवी दिल्ली : Xiaomi सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोन कसा काम करेल, याबाबत लोकांना जाणून घ्यायचे आहे. याआधी देखील आपल्या नवनवीन प्रयोगामुळे कंपनी चर्चेत राहिलेली आहे. लोक शाओमीच्या ड्रोन कॅमेरा फोनच्या रिलीजची वाट पाहत आहेत. या नवीन डिव्हाइसमध्ये काय खास आहे जाणून घेऊया. वाचा: शाओमी आपल्या ड्रोन कॅमेरा फोन कॉन्सेप्टमुळे चर्चेत आहे. या फोनच्या लाँच तारखेबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनीने एका नवीन कॅमेरा कॉन्सेप्टसाठी पेटेंट फाइल केले आहे. ही कॉन्सेप्ट नवीन स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळू शकते. पेटेंटनुसार, कंपनीच्या अपकमिंग पॉवरफुल कॅमेरा फोनमध्ये ड्रोन टेक्नोलॉजीचा समावेश असेल. म्हणजेच कॅमेरा हार्डवेअर फोनपेक्षा वेगळा होईल. हार्डवेअर कार्यरत राहावे यासाठी एक एम्बेडेड बॅटरी असेल. हे हार्डवेअर आणि पॉप-अप कॅमेऱ्याप्रमाणेच फोनच्या आत असेल. ड्रोन कॅमेऱ्याला यूजर्स आपल्या स्मार्टफोनद्वारे कंट्रोल करू शकतात. फोनचा कॅमेरा २०० मेगापिक्सल असेल. ची ही टेक्नोलॉजी नक्कीच गेम चेंजर ठरू शकते. ड्रोन हार्डवेअरला चार्ज करण्यासाठी फोनमध्ये एक लहान बॅटरी देखील दिली जाऊ शकते. ड्रोन फोमध्ये फिट झाल्यास, हा थोडा जाड होईल. मात्र, ड्रोन फोनमध्ये अडकल्यास अथवा तुटल्यास नुकसान होऊ शकते. हा फोन वॉटरप्रुफ असू शकतो. Xiaomi च्या या फ्लाइंग कॅमेरा स्मार्टफोनच्या किंमत आणि लाँच तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनीने देखील कोणता खुलासा केलेला नाही. मात्र हा पहिला असा फोन असेल ज्यात फ्लाइंग ड्रोन कॅमेरा पाहायला मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mqeFVz