Full Width(True/False)

अंकिता लोखंडे अडकणार विवाहबंधनात; अभिनेत्रीने घेतलाय हा मोठा निर्णय!

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरू आहे. विकी कौशल आणि कतरीना कैफ, राजकुमार राव-पत्रलेखा या जोड्या देखील येत्या वर्षाअखेरीस बोहल्यावर चढणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. ईटाइम्सने दिलेल्या बातमीनुसार आणि यांचे १२,१३,१४ डिसेंबर या कालावधीत लग्न करणार आहेत. सोमवारी सकाळी या दोघांनी त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडीळींना तसा मेसेजही पाठवला आहे. अंकिता आणि विकी यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याला आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांची यादी तयार केली आहे. त्या यादीनुसार हे दोघेजण त्यांना संपर्क साधत असून लग्नाचे निमंत्रण देत आहेत. इतकेच नाही तर ई टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार अंकिता आणि विकी डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत. हे दोघेजण मुंबईतच लग्न करणार आहेत. लग्नासाठी मुंबईच्या बाहेर जाण्याची या दोघांची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे हे दोघेजण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. राजकुमार राव आणि पत्रलेखा हे देखील नोव्हेंबरमध्येच लग्न करणार आहेत. तर कतरीन कैफ आणि विकी कौशल यांचे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न होणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. दरम्यान, अंकिता आणि विक्की जैनने मित्रांसोबत केलेल्या दिवाळी पार्टीचे फोटो, व्हिडिओ अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केले होते. यात एका व्हिडिओमध्ये अंकिता विक्की जैनला भर पार्टीत किस करताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. या पार्टीला अंकिताने लाल रंगाची साडी नेसलेली होती. गळ्यात मोठा नेकलेस घातला होता. या व्हिडिओमध्ये अंकिता मित्र मैत्रिणींसोबतच बॉयफ्रेण्ड विकी जैनसोबत नाचताना दिसत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pUnIRX