Full Width(True/False)

तृप्ती देसाईंची घरातून एक्झिट, आता राजकारणात होणार एण्ट्री

मुंबई- छोट्या पडद्यावरील चा कार्यक्रम दिवसागणिक अधिकाधिक उत्कंठावर्धक होत चालला आहे. गेल्या आठवड्यात मीनल, विशाल, जय, सोनाली आणि यांचे नॉमिनेशन झाले होते. त्यामुळे यांच्यातील नेमका कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. शनिवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये मीनल आणि विशाल सुरक्षित असल्याचे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तिघांपैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. रविवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाई यांना घराबाहेर जावे लागत असल्याचे जाहीर केले. मांजरेकर यांनी ही घोषणा केल्यानंतर घरातील सर्व सदस्य खूपच भावुक झाले. घराबाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई यांनी महेश मांजरेकर यांच्याशी संवाद साधताना लवकरच आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात जवळपास ५० दिवस होत्या. हा प्रवास कसा होता याविषयी त्यांनी सांगितले की, '५० दिवसांचा प्रवास फारच मोठा होता. पण बिग बॉसच्या घराबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. त्याउलट हे घर खूपच छान आहे. आतापर्यंत मी सामाजिक कामात सक्रीय होते परंतु आता लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे. बलात्कार मुक्त महाराष्ट्र हे माझे स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी तुम्हा सर्व कलाकार मंडळीचीं मला साथ हवी आहे.' असे आवाहनही तृप्ती देसाई यांनी यावेळी केले. स्पर्धकांच्या अश्रूंचा बांध फुटला रविवारी प्रसारित झालेल्या बिग बॉस मराठी ३ च्या भागामध्ये एलिमिनेशन जाहीर होण्यापूर्वी कलर्स वाहिनीवरील 'तुझ्यात जीव गुंतला' मालिकेतील अंतरा आणि मल्हार ही जोडी सर्व स्पर्धकांना भेटायला आली होती. यावेळी सर्व स्पर्धकांच्या घरातून दिवाळीनिमित्ताने आणलेल्या भेटवस्तू हे दोघेजण घेऊन आले होते. तृप्ती देसाई यांना धाकट्या भावाने पत्र लिहिले होते. तर बांगड्या भेट म्हणून पाठवल्या होत्या. पत्रामध्ये बाबा तुझी आठवण काढतात, ९.३० वाजले की म्हणतात, ‘दादा टीव्ही लाव आपली दीदी टीव्हीवर आली असेल.’ हे पत्र वाचताना तृप्ती देसाई यांना हुंदका आवरता आला नाही. मी या घरात कधी रडले नाही, पण आज डोळ्यात पाणी आले, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाई यांचे एलिमिनेशन झाल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच सर्वच स्पर्धकांच्या अश्रूंचा बांध फुटला. गायत्री दातार ओक्साबोक्शी रडत होती. तर मीरालाही अश्रू अनावर झाले होते. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत तृप्ती देसाई घराबाहेर निघत होत्या, तरी गायत्री त्यांना बिलगून रडतच होती. त्यामुळे तृप्ती ताईंचाही पाय निघत नव्हता. यावेळी दादूस देखील खूप भावनावश झाले होते. स्नेहानेही आपल्यात कुठलेच वैयक्तिक वाद नसल्याचे सांगत माफी मागितली. तर उत्कर्ष शिंदेनेही तृप्ती देसाई यांना नॉमिनेट केल्याबद्दल क्षमा मागितली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ke17fi