Full Width(True/False)

कंगना रणौत, अदनान सामी यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव

मुंबई : मनोरंजन क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात सोमवारी झालेल्या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक , अभिनेत्री यांना देऊन गौरवण्यात आले. तर गायक एसपी बालसुब्रमणयम यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. हिंदी सिनेसृष्टीतील कंगना रणौत, अदनान सामी, करण जोहर, यांना पुरस्कार जाहीर झाले. पद्म पुरस्कारांचे वितरण दोन भागात होणार आहे. सोमवारी झालेल्या सोहळ्यामध्ये २०२० साठी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत, गायक अदनान सामी, दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम, अभिनेत्री सरिता जोशी यांचा समावेश होता. तर मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात २०२१ साठी निवडण्यात आलेल्या मान्यवरांना पद्म पुरस्कार दिले जाणार आहेत. सोमवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात १० जणांना पद्म भूषण, १०२ जणांना पद्मश्री तर सात जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कंगनाला सिनेमाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कंगनासोबत तिची बहिण रंगोली देखील उपस्थित होती. अदनान यांना कला आणि संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अदनान सामी यांची पत्नी उपस्थित होती. प्रसिद्ध अभिनेत्री सरिता जोशी यांना देखील कला आणि थिएटरमध्ये दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गायक एसपी बालसुब्रमण्यम यांना मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकता कपूर आणि करण जोहर यांचाही राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kgtsSn